घरमुंबईविना प्रिस्क्रिप्शन औषध विक्री भोवणार

विना प्रिस्क्रिप्शन औषध विक्री भोवणार

Subscribe

विना प्रिस्क्रिप्शन औषध विकणाऱ्यांवर एफडीएकडून कारवाई कारवाई करण्यात येणार आहे. 

अनेकदा आजार होण्यासाठी वातावरणात असणारे विषाणू कारणीभूत असतात. हे विषाणू आपल्या शरीराची रोगप्रतिकारकशक्ती कमी करतात. त्यामुळे आपल्याला सर्दी, खोकला, ताप यासारखे अनेक आजार जडतात. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण कोणत्याही डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय स्वत:च औषधं घेतो. त्याचा परिणाम काय होणार? याचा आपण विचारही करत नाही. पण, आता नागरिकांना विना प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधं देणाऱ्यांवर एफडीएकडून कारवाई केली जाणार आहे.

औषध विक्री दुकानाची तपासणी मोहिम

औषध विक्रेत्यांकडून विना प्रिस्क्रिप्शन अँटीबायोटीक सर्रासपणे मोठ्या प्रमाणात रुग्णाला देतात. त्यामुळे, याविषयी पडताळणी करुन कारवाई करण्याच्या हेतूने जून आणि जुलै या महिन्यात एफडीएच्या औषध निरीक्षकांमार्फत राज्यातील काही किरकोळ औषध विक्री दुकानाची तपासणी मोहिम घेतली गेली. या मोहिमेअंतर्गत मुंबई विभागातील काही किरकोळ औषध विक्री दुकानांची तपासणी केली. त्यात मुंबईतील १३, कोकणातील ६, पुण्यातील ८, नाशिक ५, औरंगाबाद ५ आणि नागपूर ६ अशा प्रकारे एकूण ४३ औषध विक्रेत्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. यातील बहुतेक औषध विक्रेत्यांनी डॉक्टराचे प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री केल्याचे आढळून आले. त्यामध्ये अपोलो फार्मसी, जेनरिको, मेट्रो मेडिकल यांच्या काही दुकानांचा आणि इतर संस्थेचा समावेश आहे.

- Advertisement -

अँटीबायोटीक औषधांचा अति वापर जीवघेणा

अँटीबायोटीक औषधांच्या अति वापरामुळे प्रतिकारशक्ती कमी होते आणि भविष्यात आरोग्याचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे, एफडीएकडून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तसंच प्रिस्क्रिप्शन शिवाय अँटीबायोटीक औषधाचे सेवन करु नये तसंच प्राप्त औषधांचा वापर वैद्यकीय व्यावसायिकांनी दिलेल्या सल्ल्यानुसारच करावा असं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे.

एफडीएकडून विना प्रिस्क्रिप्शन औषधं विकणाऱ्यांची तपासणी करुन कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत ४३ औषध विक्रेत्यांची तपासणी केली गेली. यात जे दोषी आढळतील त्यांच्याविरोधात औषधे आणि सौंदर्य प्रसाधने नियम १९४५ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.
डॉ. पल्लवी दराडे, आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -