घरमहाराष्ट्रनाशिकपंचवटीत मटक्याच्या अड्ड्यावर छापा; २९ जुगारी अटकेत

पंचवटीत मटक्याच्या अड्ड्यावर छापा; २९ जुगारी अटकेत

Subscribe

२९ खेळींना अटक, मटका चालक फरार

पोलिस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पेठरोड येथील मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांनी मंगळवारी (दि. ९) रात्रीच्या सुमारास छापा टाकून २९ जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे ५० हजार रुपयांची रोकड आणि काही स्मार्टफोन जप्त केले. याप्रकरणी मटका अड्ड्याचा चालक-मालक फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पेठरोडवरील बी झेड प्लाझा या इमारतीच्या तळमजल्यात कल्याण मटका खेळला जात असल्याची माहिती पंचवटी पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रात्री ८ वाजेच्या सुमारास मटका अड्ड्यावर धाड टाकली. यावेळी २९ मटका खेळणाऱ्यांना या ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्याविरोधात कारवाई केली. या वेळी पोलिसांनी रोख रक्कम ४८ हजार ५०० रुपये व ३९ हजार ६०० रुपये किंमतीचे मोबाईलही जप्त केले. सर्व मटका आणि जुगाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मटकाचालकाला मात्र पोलिसांनी अभय देत त्याचे नावही गुन्ह्यात टाकले नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -