घरताज्या घडामोडी'या' रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी ई-सायकाल सेवा

‘या’ रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी ई-सायकाल सेवा

Subscribe

भारतीय रेल्वेत पहिल्यांदाच प्रयोग होणार

शहरातील वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि सार्वजनिक वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने रेल्वे प्रवाशांसाठी अ‍ॅप बेस्ट ई- सायकाल योजना सुरु करण्यात येणार आहे. ही योजना सर्वप्रथम मध्य रेल्वेच्या कुर्ला रेल्वे स्थानकावर सुरु करण्यात येणार आहे. याची निविदा प्रक्रिया सुरु केली असून लवकर मुंबईच्या प्रमुख रेल्वे स्थानकांवर ई-सायकल योजना सुरु होणार आहे. विशेष म्हणजे भारतीय रेल्वे पहिल्यांदाच असा प्रकल्प राबवित असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून देण्यात आली आहे.

मध्य रेल्वेकडून पर्यावरण रक्षणासाठी नेहमीच भर दिला जात आहे. कधी ऑक्सीजन पार्लर तर कधी रेल्वे स्थानकांच्या परिसरात रोप वाटीका लावण्यात येत आहे. आता तर मेट्रो रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर मध्य रेल्वे सुध्दा प्रवाशांच्या सोय सुविधेसाठी प्रदूषणरहित अ‍ॅप बेस्ट ई सायकल सेवा उपल्बध करून देणार आहे. त्यासाठी निविदा सुध्दा काढण्यात आली आहे. कोणत्याही रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यासाठी अ‍ॅप बेस्ट ई-सायकल सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सर्व प्रथम हा प्रकल्प मध्य रेल्वेच्या कुर्ला रेल्वे स्थानकावरुन सुरु होणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वे या अ‍ॅप बेस्ट ई सायकच्या पार्किंगसाठी ११५ स्क्वेअर मिटर जागा उपल्बध करून देणार आहे. या प्रकल्पाचा प्रतिसाद बघून इतर रेल्वे स्थानकांवरही योजना सुरु कण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दैनिक आपलं महानगरला दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – स्वतंत्र कोकण विद्यापीठासाठी ९० दिवसांत निर्णय!

अशी असणार ई सायकल

प्रदूषणरहित अ‍ॅप बेस्ट ई सायकल सेवा रेल्वे स्थानकाच्या बाहेर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही सायकल सेवा वापरण्यासाठी मोबाईलवर प्रवाशांसाठी एक अ‍ॅप असणार आहे. प्रवाशांना हे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. सायकल बुक करायची, अ‍ॅपवरुन क्यूआर कोड स्कॅन करायचा आणि सायकल घेऊन जायची. काम झाल्यावर जवळच्या सायकल हबमध्ये सायकल परत करायची. जेवढा वेळ सायकल वापरली जाईल, तेवढे पैसे अ‍ॅपच्या माध्यमातून कापले जातील. ही सायकल वापरण्यासाठी दहा मिनिटांसाठी १ रुपया एवढा दर आकारला जाउु शकणार आहे. दिवसभरासाठी २० ते 100 रुपये तर सायकलचा महिन्याचा पास ३०० ते ५०० रुपयात मिळणार आहे. मात्र निविदा प्रक्रिया पुर्ण झाल्याशिवाय या सायकलचे भाडे ठरणार नाही आहे.

भारतीय रेल्वेत हा पहिला प्रयोग

प्रदूषणरहित अ‍ॅप बेस्ट ई सायकल सेवा सुरु करणारे कुर्ला रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेतील पहिले स्थानक ठरणार आहे. यापुर्वी मध्य रेल्वेने याच कुर्ला रेल्वे स्थानकावरुन ई-बस सुरु केली आहे. त्याच पाठपाठ आता पर्यावरण रक्षणासाठी अ‍ॅप बेस्ट ई सायकल सेवा सुरु करुणार आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेत हा पहिलाच प्रयोग असणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.

- Advertisement -

नोकरदार आणि विद्यार्थी वर्गाला होणार फायदा

वांद्रे (पूर्व) ते कुर्ला (पश्चिम) आणि वांद्रे-कुर्ला संकुलात मोठ्या प्रमाणात नोकरदा वर्ग जात असतात. त्यामुळे कुर्ला रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ही योजना सुरु होता प्रवाशांना स्वत:ची ई सायकल घेऊन जाता येणार आहे. तसेच कुर्ला रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडून मोठ्या प्रमाणात विद्यार्थीवर्ग मुंबई विद्यापीठाच्या कलीना कॅम्पसमध्ये जात असतात. त्यामुळे त्यांना या अ‍ॅप बेस्ट ई सायकलचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -