घरमुंबईअंडी ही कडाडली!

अंडी ही कडाडली!

Subscribe

वातावरणात गारवा आला की, अंडी जास्त खाल्ली जातात. त्यामुळे वाढती मागणी पाहता येत्या काही दिवसात अंडयांचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पावसाळा सुरु झाला की, महागाईचं शुक्लकाष्ट मागेच लागतं. मुंबईत भाज्या, फळे महाग झाली आहेत. आणि आता त्यात अंड्याची देखील भर पडली आहे. जुलै महिन्यात अंड्याच्या दरात लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. उन्हाळ्यात दुर्लक्षित झालेल्या अंड्याला पावसाच्या दिवसात जास्त मागणी असते. त्यामुळेच या अंड्यांचे भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. ५ रुपयांचे अंडे आता ७ रुपये दराने मिळत आहे. आणि येत्या काही दिवसात अंड्याची किंमत आणखी वाढण्याची शक्यता अंड विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

मागणी वाढल्याने दरात वाढ

उन्हाळयात अंडी उष्ण म्हणून जास्त खाल्ली जात नाहीत. मात्र पावसाळ्यात अंडी आवर्जून खाल्ली जातात. त्यामुळे अंड्यांची मागणी या दिवसात वाढते. शिवाय मासेमारी बंद असल्यामुळे मासांहार करणाऱ्यांना अंडी हा एकमेव पर्याय उरतो. त्यामुळे साहजिकच अंड्यांची मागणी वाढते. त्यामुळे दरवर्षी या कालावधीत ही दरवाढ झालेली बघायला मिळते. सध्या अंडी ७२ रुपये डझन आहे. महिन्याभरापूर्वी ६० रुपये डझन होती. तब्बल १२ रुपयाने ही अंडी महागली आहे. अंडी महाग असून देखील अंडी घेण्याऱ्यांची संख्या मात्र कमी झालेली नाही.

- Advertisement -

अंडी आणखी महागणार

वातावरणात गारवा आला की, अंडी जास्त खाल्ली जातात. त्यामुळे वाढती मागणी पाहता येत्या काही दिवसात अंडयांचे भाव आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे अंडी विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

भूर्जी पावची गाडी जोरात

उन्हाळयात भूर्जी पावच्या गाडीकडेही न फिरकणारे आता या गाड्यांवर गर्दी करु लागले आहेत. त्यामुळे आता नाक्या नाक्यावरील भूर्जी पाव, ऑम्लेट पावच्या गाड्यांवर गर्दी होऊ लागली आहे. अंडी महाग असली तरी चमचमीत भूर्जी आणि ऑम्लेट खाणाऱ्या खव्वयांमुळे भूर्जी पावचा धंदयाला मात्र तेजी आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -