घरक्रीडाअर्जुन तेंडुलकर सलामीच्या सामन्यात शून्यावर बाद

अर्जुन तेंडुलकर सलामीच्या सामन्यात शून्यावर बाद

Subscribe

भारतविरूद्ध श्रीलंका १९ वर्षांखालील संघांत सुरू असलेल्या कसोटी सामन्यात अर्जुन तेंडुलकर आपले धावांचे खाते न खोलताच बाद झाला असून हा त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना आहे.

क्रिकेट जगतातील देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने भारताच्या अंडर १९ संघांकडून श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी सामन्यात आपले पदार्पण केले त्याने सर्वात आधी भारताकडून बॉलिंग करताना पहिल्या १२ बॉलमध्ये आपली पहिली आंतरराष्ट्रीय विकेट घेतली. मात्र बॅटिंगसाठी आल्यानंतर अर्जुन एकही धाव न करताच बाद झाला. दुलशानच्या बॉलिंगवर पसिन्दुने अप्रतिम कॅच घेत अर्जुनला शून्यावर बाद केले. अर्जुन ११ बॉल खेळला मात्र तो एकही धाव करू शकला नाही. अर्जुन बाद झाला तेव्हा संघांचा स्कोर ५२८ वर ८ बाद असा होता अर्जुननंतर भारताचा सर्व संघ एकएक करत कोलमडला आणि डावाअखेर भारताचा स्कोर ५८९ असा होता. भारताकडून सर्वाधिक आयुषने नाबाद १८५ तर अथर्वने ११३ धावा केल्यामुळे भारत इतकी मोठी धावसंख्या उभी करू शकला.

atharva taide
अथर्व तायडे (सौजन्य – फेसबुक)

भारताकडून बॉलिंग करताना अर्जुनने आपली स्वत:ची दुसरी तर संघाची तिसरी ओव्हर टाकत आपली पहिली आंतरराष्ट्रीय विकेट घेतली. त्याने श्रीलंकेचा सलामीवीर कामिल मिश्राला एलबीडब्लु आउट केले. कमिलने ११ बॉलमध्ये दोन फोर लावत ९ रन केले होते. त्यानंतर भारताकडून हर्ष त्यागी आणि आयुष बडोनी यांनी प्रत्येकी ४ तर मोहितने १ विकेट घेत श्रीलंकेचा पहिला डाव २४४ धावात संपवला. त्यानंतर भारताकडून ५८९ धावा करत श्रीलंकेवर ३२८ धावांची आघाडी मिळवली. सध्या श्रीलंका बॅटिंग करत असून ६ ओव्हरनंतर त्यांचा स्कोर १८ आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -