घरताज्या घडामोडीन्याय हक्कासाठी मंत्रालयासमोर पेटवून घेतलेल्या 'त्या' शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

न्याय हक्कासाठी मंत्रालयासमोर पेटवून घेतलेल्या ‘त्या’ शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Subscribe

पावसाळी अधिवेशनावेळी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या शेतकऱ्याचा अखेर मृत्यू झाला आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सुभाष भानुदास देशमुख या उस्मानाबादच्या शेतकऱ्याने मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.

पावसाळी अधिवेशनावेळी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या शेतकऱ्याचा अखेर मृत्यू झाला आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सुभाष भानुदास देशमुख या उस्मानाबादच्या शेतकऱ्याने मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्याला उपचारांसाठी जे. जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांना सुभाष यांनी साथ न दिल्याने त्यांचा अखेर मृत्यू झाला. (farmer dead who was set on fire in front of the mantryala died during treatment mumbai)

सुभाष देशमुख हे उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील तांदूळवाडी गावचे रहिवासी होते. 23 ऑगस्ट रोजी दुपारी त्यांनी मंत्रालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून देशमुख यांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचवेळी तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी धाव घेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हातातून पेट्रोलची बाटली हिसकावून घेतली.

- Advertisement -

या घटनेमध्ये देशमुख हे जखमी झाले होते. त्यांना तातडीने जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर जे.जे. रूग्णालय येथे उपचार सुरू होते. आज 29 ऑगस्ट रोजी उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्लास्टिक सर्जरी विभागाचे डॉक्टर सागर गुंडेवाल यांनी त्यांना 11:55 वा. मयत घोषित करण्यात आले.

सुभाष देशमुख यांनी त्यांच्या गावाकडील जमीन हडपली असल्याच्या कारणावरून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता.

- Advertisement -

विरोध पक्षनेते अजित पवारांनी घेतली होती भेट

शेतीच्या प्रश्नामुळे त्रस्त असणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी सुभाष देशमुख यांनी 23 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यामध्ये सुभाष देशमुख काही प्रमाणात भाजले होते. त्यांना उपचारार्थ मुंबई येथील जे. जे. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रुग्णालयात जाऊन शेतकरी सुभाष देशमुख यांची भेट घेतली होती. त्यांच्या तब्बेतीची चौकशी करत त्यांची अडचण जाणून घेतली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शेतकऱ्यांना भावनिक पत्र

शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्र लिहिले असून, यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना शिवछत्रपतींची शपथ देत आत्महत्या न करण्याचे आवाहन केले आहे. “महाराष्ट्र हा लढवय्यांचा आहे. तुमच्यासारख्या कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे. भारताच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणारे लढाऊ बाण्याचे जवान या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पोटीच जन्माला आलेत. घाम गाळत जमीन कसून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून तुम्ही केवळ स्वतःचंच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्राची देशाची भूक भागवत आहात. म्हणून तर या मराठी मातीवर पहिला हक्क कोणाचा असेल, तर तो तुम्हा शेतकरी बांधवांचा आहे. परंतु, अचानक नैसर्गिक, कौटुंबिक, आर्थिक संकट आल्यावर तुम्हाला हवालदिल होताना पाहून मन कासावीस होऊन जातं”, असे मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांनी म्हटले.


हेही वाचा – वांद्रे – वरळी सी लिंक टोल घेण्यासाठी नव्या कंत्राटदारांची नियुक्ती

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -