घरमुंबईकोरोना नियमांचे उल्लंघन, बॉलिवूड अभिनेत्री गौहर खानविरोधात गुन्हा दाखल

कोरोना नियमांचे उल्लंघन, बॉलिवूड अभिनेत्री गौहर खानविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

कोरोना पॉझिटिव्ह असतानाही बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान ओशिवरा परिसरात फिरत असल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अभिनेत्री गौहर खानकडे मुंबई आणि दिल्ली अशा दोन वेगवेगळया ठिकाणचे कोविड रिपोर्ट आढळले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह असतानाही गौहर खान निगेटिव्हचा रिपोर्ट दाखवत ओशिवरा भागात वावरत होती. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने अभिनेत्री गौहर खानविरोधात मुंबईतील ओशिवरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. या गौहर खानविरोधात कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. यासंबंधीचे ट्विट मुंबई पोलीसांनी केले आहे. तर मुंबई महानगरपालिकेनेही यांसंबंधीची माहिती दिली ट्विटवरुन दिली आहे.

बॉलिवूडमधील अभिनेता रणबीर कपूर, दिग्दर्शक संजयलीला भंसाळी, आशिष विद्यार्थी, नील भट्ट, ऐश्वर्या शर्मा, मनोज वाजपेयीसह अनेक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. परंतु या सर्व एक्टर्सनी स्वत:ला होम क्वारंटाईन करु घेतले आहे.  गौहर खानचे वडील जफर खान यांचे दुर्धर आजाराने नुकतेच निधन झाले. यावेळी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे गौहर खानलाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.

- Advertisement -

मुंबईच्या ओशिवरा अभिनेत्री गौहर खान राहते. तिच्याकडे मुंबई आणि दिल्ली अशा दोन भागातील वेगवेगळे कोरोना रिपोर्ट आढळून आले आहेत. या दोन रिपोर्टमधील एक रिपोर्ट पॉझिटिव्ह तर दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह होता. यातील ११ मार्चचा मुंबईतील पहिला रिपोर्ट पॉझिटिव्ह होता तर १२ मार्चचा दुसरा रिपोर्ट दिल्लीतील होता. तो निगेटिव्ह रिपोर्ट होता. त्यामुळे मुंबईतील पॉझिटिव्ह रिपोर्ट असतानाही अभिनेत्री गौहर खानला कोरोनाचा निगेटिव्हचा रिपोर्ट मिळवला कसा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे अभिनेत्री गौहर खानने कोरोना रिपोर्टशी झेडझाड केला तर नाही ना याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. दरम्यान पॉझिटिव्ह रिपोर्ट असतानाही अभिनेत्री गौहर खान ओशिवारा भागात फिरत असल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी तक्रार केली. त्यानंतर मुंबई पालिकेने याची शहानीशा करत अभिनेत्रीवर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली.

- Advertisement -


हेही वाचा- सचिन वाझेंची १० महिन्यांची वादग्रस्त कारकीर्द


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -