घरमुंबईघाटकोपर विमान दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल

घाटकोपर विमान दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल

Subscribe

२८ जून २०१८ रोजी घाटकोपर येथे झालेल्या विमान दुर्घटनेप्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यु वाय एव्हिएशन या कंपनीच्या मालकीचे हे विमान होते आणि या विमान दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर, दोघे जण जखमी झाले होते. विमान दुर्घटनेत पायलट मार्या झुबेरी यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याचे पती प्रभात देशकुमार कथारीया यांनी यु वाय एव्हिएशन कंपनीचे मालक दीपक कोठारी, अनिल चौहान विनोद साई आणि संबंधित अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल केला आहे. घाटकोपर येथे दुर्घटना झालेल्या विमानाचे बेकायदेशीररित्या उड्डाण केल्याचा आरोप मार्या झुबेरी यांचे पती प्रभात कथारीया यांनी यापूर्वी केला होता.

दुर्घटना झालेले विमान हे मूळचे उत्तर प्रदेश सरकारचे असून, उत्तर प्रदेश सरकारने ते भंगारात विकायला काढल्यानंतर यु वाय एव्हिएशन कंपनीने विकत घेतले होते. त्यावर पुरेसे काम न करता कोणत्याही परवानगीशिवाय त्याचे उड्डाण करण्यात आले. त्यामुळेच ही दुर्घटना घडली असल्याचा आरोप कथारीया यांनी केला आहे. २८ जून २०१८ रोजी घाटकोपर परिसरात ही विमान दुर्घटना घडली होती ज्यामध्ये विमानात असणार्‍या पाच जणांचा आणि एका पादचार्‍याचा जागीच मृत्यू झाला होता. यामध्ये पायलट मार्या झुबेरी, प्रदिप राजपुत, इंजिनीयर सुरभी गुप्ता, टेक्निशियन मनिष पांडे आणि पादचारी गोविंद दुबे हे जागीच ठार झाले होते. या दुर्घटनेनंतर मयतांच्या नातेवाईकांनी विमानाची संपूर्ण माहिती काढायला सुरुवात केली असता त्या विमानाची दुरुस्ती केली नसल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

विमानाची अर्धवट दुरुस्ती करणार्‍या इंदमार एव्हिएशन कंपनीच्या राजीव गुप्ता, अविनाश भारती आणि इतर संबंधित अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घाटकोपरच्या पृथ्वी कन्स्ट्रक्शन जवळ या विमानाची दुर्घटना घडली होती. यामध्ये एकूण पाच जणांचा मृत्यू झाला होता. पायलट मार्या झुबेरी यांचे पती प्रभात कथारीया यांनी यापूर्वीदेखील याविरोधात आवाज उठवला होता. अखेर घाटकोपर पोलीस ठाण्यात याप्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -