घरमुंबईमुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ सापडलेल्या स्फोटकाप्रकरणी FIR दाखल

मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ सापडलेल्या स्फोटकाप्रकरणी FIR दाखल

Subscribe

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटेलिया या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये जिलेटीनच्या कांड्या सापडल्याने आज संध्याकाळच्या सुमारास एकच खळबळ उडाली. याप्रकरणी काही तासांनंतर मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदविल्याचे वृत्त आहे. दरम्यान, कार्मिकल रोडवरील अल्ट्रा-लक्झरी इमारत अँटेलियाच्या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ पार्क केलेल्या दोन व्यक्तींचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. गामदेवी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर नोंदविण्यात आला.

- Advertisement -

पोलिसांनी आयपीसी कलम २८६ (स्फोटक पदार्थाच्या बाबतीत निष्काळजीपणाने वागणे), ४६५ (बनावट शिक्षेची शिक्षा), ४७३ (बनावट शिक्का बनविणे किंवा बाळगणे), ५०६ (२) (फौजदारी धमकी देणे), १२० (बी) (गुन्हेगारी कट) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय, स्फोटक पदार्थ अधिनियम, १९०८, नुसार, स्फोट घडवून आणण्याच्या प्रयत्नाबद्दल शिक्षा, किंवा जीव किंवा मालमत्तेस धोक्यात घालण्याच्या उद्देशाने स्फोटक बनवण्यासाठी किंवा ठेवल्याबद्दलची शिक्षा यासारख्या शिक्षा देखील एफआयआरमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

मुंबई पोलीस म्हणाले…

मुंबई पोलिसांनी अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एक संशयास्पद गाडी ही गावदेवी पोलिस स्टेशनच्या हद्दीत सापडली आहे. दक्षिण मुंबईत कार्मिकल रोडवर ही बेवारस गाडी सापडली आहे. मुंबई पोलिसांची तसेच आणखी टीम घटनास्थळी पोहचल्या आहेत. तपासादरम्यान गाडीत काही जिलेटीनच्या काड्या सापडल्या आहेत. पण ही स्फोटके कोणत्याही उपकाराणाला जोडली गेलेली नव्हती असेही मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणातील आणखी तपास सुरू असल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

असा घडला प्रकार

गावदेवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कार्मिकल रोडजवळ एक संशयित स्कॉपिओ कार होती. या कारमध्ये स्फोटके असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीनंतर गावदेवी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी दाखल झाले होते, काही वेळाने तिथे बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वान पथकासह आले. या पथकाने संपूर्ण कारची तपासणी केल्यावर त्यात जिलेटीनच्या कांड्या, काही स्फोटके, अनेक नंबर प्लेट आणि इतर साहित्य सापडले. मात्र त्या जिलेटीन कांड्या असेम्बल करण्यात आल्या नव्हता. त्या कांड्या गाडीत एका कोपर्‍यात ठेवण्यात आल्या होत्या. स्फोटकांनी भरलेली कार सापडल्याची माहिती मिळताच सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांनी तिथे धाव घेतली. या संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होती.

या घटनेची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेत त्याचा तपास एटीएस आणि गुन्हे शाखेला दिला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. ही कार कोणी तिथे आणली, कारमध्ये किती लोक होते. ही कार पार्क करुन संबंधित आरोपी तेथून कसे गेले याचा आता पोलिसांकडून तपास सुरु आहे

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -