आधी मैत्रीण आता सासू, उर्फीच्या ट्वीटची चर्चा

urfi javed complaint against bjp leader chitra wagh women commission

मुंबई – आपल्या अतरंगी कपड्यांवरून सातत्याने चर्चेत असलेली प्रसिद्ध मॉडेल उर्फी जावेद हिने पुन्हा चित्रा वाघ यांना डिवचलं आहे. यावेळी तिने एकदम हटके पद्धतीने चित्रा वाघांवर निशाणा साधला आहे.

‘मेरी डीपी इतनी ढासू, चित्रा मेरी सासू,’ असं ट्वीट उर्फी जावेदने केलं आहे. तासाभरात दोन ट्वीट करत तिने चित्रा वाघ यांना डिवचलं आहे. याआधी तिने एक फोटो पोस्ट करून मी अजून सुधारायची बाकी आहे, असं उर्फीने म्हटलं होतं.

उर्फी तोकडे कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी फिरते, त्यामुळे समाजस्वास्थ्य बिघडत असल्याचा आरोप भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केला होता. आपल्याला विरोध होत असल्याने उर्फीनेही चित्रा वाघ यांना सोडलं नाही. त्यांची राजकीय प्रकरणे बाहेर काढत उर्फीने त्यांना छेडलं. संजय राठोडप्रकरणावरून उर्फीने चित्रा वाघ यांना टोला लगावला. त्यामुळे चित्रा वाघ यांना संताप अनावर झाला. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने उर्फीवर कारवाई करावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली. मात्र, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्यांची ही मागणी फेटाळून लावली. बदल्यात चित्रा वाघ यांनाच नोटीस बजावली. उर्फीवरून सुरू झालेल्या या प्रकरणात आता राजकारण रंगलेलं असताना उर्फीने पुन्हा एक फोटो पोस्ट केलाय. यात तिने गुलाबी रंगाचा पूर्ण बाह्याचा ब्लाऊज आणि लेहेंगा परिधान केला आहे.

उर्फी अंगभर कपडे घालत नाही, म्हणून चित्रा वाघ यांनी तिच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे चित्रा वाघ यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी उर्फीने अंगभर कपडे घातले. पण एवढ्यावरच थांबेल तर ती उर्फी कसली. पूर्ण बाह्याचे कपडे, लेहेंगा असला तरीही ब्लाऊज तिचा बॅकलेस आहे. त्यामुळे आपल्या बॅकलेस असलेल्या गुलाबी रंगाच्या पेहरावाचा फोटो तिने ट्विटरवर अपलोड केला आहे. ‘लेकीन अभी बहोत सुधार बाकी है, सॉरी चित्रा वाघ जी. आय लव्ह यू’ म्हणत तिने चित्रा वाघांना खोचक टोला लगावला आहे.