घरताज्या घडामोडीराज्याच्या राजकारणात चाललंय काय? शिवसेनेनंतर आता काँग्रेसचे पाच आमदार नॉट रिचेबल

राज्याच्या राजकारणात चाललंय काय? शिवसेनेनंतर आता काँग्रेसचे पाच आमदार नॉट रिचेबल

Subscribe

काँग्रेसचे पाच आमदारांशी संपर्क होत नाहीये.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता काँग्रेसचे पाच नेतेही नॉट रिचेबल असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान हे नॉट रिचेबल आमदार नेमके कोण आहेत हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. हे नॉट रिचेबल आमदार कोणत्या ठिकाणी आहेत हे कुणालाच माहिती नसल्याचेही समोर आले आहे. (Five MLA from Congress Not reachable now)

विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची मतं फुटल्याचं समोर आलं होतं. या निवडणुकीत काँग्रेसमध्ये क्रॉस व्होटिंग झाल्याचंही चर्चा आहे. त्यांच्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची मतंही मिळवता आली नव्हती.

- Advertisement -

विधान परिषदेची निवडणूक होताच शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं. सकाळपासून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. म्हणूनच काँग्रेसने आज आपल्या आमदारांना मुंबईत बोलावलं होतं. त्यामध्ये पाच आमदार मुंबईत आले नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शिवसेनेसोबतच आता काँग्रेसची डोके दुखी वाढल्याचही स्पष्ट झालं आहे. दरम्यान,  उद्या कमलनाथ यांच्या उपस्थितीत काँग्रेसची महत्त्वाची बैठक होत असून त्या बैठकीला आता हे आमदार उपस्थित राहणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -