घरमुंबईपायाच्या गुठळ्यांकडे दुर्लक्ष करु नका

पायाच्या गुठळ्यांकडे दुर्लक्ष करु नका

Subscribe

पायात येणाऱ्या गुठळ्यांकडे अनेकदा नॉर्मल आहे असं समजून दुर्लक्ष केलं जातं. पण, हे दुर्लक्ष करणं जीवावर बेतू शकतं.

पायात येणाऱ्या गुठळ्यांकडे अनेकदा नॉर्मल आहे असं समजून दुर्लक्ष केलं जातं. पण, हे दुर्लक्ष करणं जीवावर बेतू शकतं. तसाच एक प्रकार मुंबईत घडला आहे. मुंबईतील ५८ वर्षीय नितीन सिंग ( बदललेलं नाव) यांचा ६ महिन्यांपासून डावा पाय जड आणि त्यात कोणत्याही प्रकारच्या संवेदना जाणवत नव्हत्या. त्यानंतर, एका आठवड्यापासून त्यांच्या पायात तीव्र वेदना जाणवू लागत होत्या. तसेच अशक्तपणा देखील आला होता. त्यांनंतर त्यांना चालायला ही त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी या समस्येसाठी त्यांना मुंबईतील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यांच्यावर डॉक्टरांनी वेळीच योग्य उपचार केल्याने त्यांचा पाय आणि प्राण दोन्ही वाचवण्यात यश आलं आहे. आता ते पूर्वीसारखे आयुष्य जगत आहेत.

- Advertisement -

या रुग्णाच्या बाबतीत सुरूवातीला असं वाटत होतं की त्यांच्या डाव्या पायातील जोर पक्षाघातामुळे गेला आहे. पण, नंतर त्यांचा डावा पाय थंड लागत असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं. म्हणून, त्यांच्या दोन्ही पायांचे ठोके तपासले गेले. तेव्हा ठोके जाणवत नव्हतेडॉ. शिरीष हस्तक; न्युरोलॉजिस्ट, वोक्हार्ड्ट हॉस्पिटलमधील सल्लागार

रूग्णाचा पाय वाचवण्यात डॉक्टरांना यश

त्यानंतर, तात्काळ त्यांच्या पायाची अँजिओग्राफी करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार, त्यांच्या दोन्ही पायांतील धमन्या (डाव्या पायातील फेमोरल आर्टरी आणि उजव्या पायातील लेगपोप्लिटीअल) गुठळ्या झाल्याचं अँजिओग्राफीत आढळलं. त्यांचा डावा पाय झपाट्याने थंड आणि निळा होत होता. पायातील गुठळ्या काढण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यानुसार, व्हस्क्युलर सर्जन यांची टीम बोलावण्यात आली. व्हस्क्युलर सर्जन डॉ. परेश पै यांनी तातडीने त्यांच्या दोन्ही पायांतील गुठळ्या काढल्या. काही दिवसांनी नितीन यांना डिस्चार्ज देण्यात आला. आता नितीन यांची प्रकृती स्थिर असून ते पुर्वीप्रमाणेच कामही करू लागले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – योग्य निदानामुळे वाचली शस्त्रक्रिया; १५ वर्षीय मुलीला दुर्मिळ जीआय ट्रॅक्ट व्हायरल इन्फेक्शन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -