घरताज्या घडामोडीभाजप नगरसेवकांत 'या' कारणास्तव राडा; माजी नगरसेविका रितू तावडे जखमी

भाजप नगरसेवकांत ‘या’ कारणास्तव राडा; माजी नगरसेविका रितू तावडे जखमी

Subscribe

बिंदू त्रिवेदी या माझ्या अंगावर धावून आल्या होत्या. त्याचा जाब विचारण्यासाठी मी गेले असता माजी नगरसेवक प्रवीण छेडा यांनी बिंदू त्रिवेदी यांचा बचाव करीत माझ्या परवानगीशिवाय माझा हात जोरात दाबून धरला व मला जागचे हलू दिले नाही असे रितू तावडे यांनी म्हटलं आहे.

मुंबई महापालिका निवडणूक प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर भाजपच्या माजी नगरसेवका रितू तावडे व बिंदू त्रिवेदी यांच्यात ‘राडा’ सुरू झाला आहे. या घटनेत मध्यस्थी करायला माजी नगरसेवक प्रवीण छेडा पुढे सरसावले. मात्र एकूण घटनाप्रकारात माजी नगरसेविका रितू तावडे यांच्या हाताला जबर दुखापत झाली असून राजावाडी रुग्णालयात त्यांच्या हातावर उपचार करण्यात आले.

हल्ला झाल्याच्या घटनेनंतर माजी नगरसेविका रितू तावडे यांनी, सदर घटनेला बिंदू त्रिवेदी व दुखापतीला प्रवीण छेडा हे दोघेही जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच, सदर घटनाप्रकार हा पूर्व नियोजित हल्ला असून या घटनेचा तीव्र निषेध करीत असल्याचे रितू तावडे यांनी म्हटले आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन पक्षाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी रितू तावडे यांनी केली आहे.

- Advertisement -

या एकूणच घटनेतून निवडणूक पार पडण्यापूर्वीच भाजपमधील राड्याने पक्षातील अंतर्गत वादविवादाला वेगळेच तोंड फुटले आहे. त्यावर वेळीच तोडगा न निघाल्यास याचा निवडणुकीवर व निकलावरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मुंबई महापालिका निवडणूक ही भाजप व सत्ताधारी शिवसेना यांच्यात प्रतिष्ठेची मानली जात आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा जिंकूनही सत्तेच्या वाट्यातून सेना व भाजप यांच्यात वाद निर्माण होऊन राज्यातील सत्ता हातातून गेल्याने भाजप पक्ष हवालदिल झाला. तेव्हापासून भाजप मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. मात्र पालिकेच्या निवडणुकीत प्रभाग रचना व प्रभाग आरक्षण सोडतीवरून राजकीय वादळ उठले आहे. प्रभाग आरक्षणावरूनच भाजपमध्ये वादविवाद सुरू झाला आहे. घाटकोपरमध्ये पूर्व व पश्चिम विभागात भाजपचे काही माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार हे प्रखर दावेदार झाले आहेत.

यामध्ये, माजी नगरसेवक प्रवीण छेडा, भालचंद्र शिरसाट व बिंदू त्रिवेदी हे तिघेही एकाच प्रभागात निवडणूक लढविण्यासाठी दावेदार मानले जातात. मात्र पक्षाने तोडगा काढला तर आजूबाजूच्या प्रभागात त्यांचे बस्तान बांधले जाऊ शकते. तर भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडे व बिंदू त्रिवेदी यांच्यात अगोदरपासूनच वाद होते, असे खुद्द रितू तावडे यांनीच म्हटले आहे.

- Advertisement -

पालिका निवडणुकीबाबत गुरुवारी भाजपची घाटकोपर येथे बैठक झाली. या बैठकीनंतर माजी नगरसेविका रितू तावडे व बिंदू त्रिवेदी यांच्यात काही तरी वादविवाद झाला. शाब्दिक चकमक झाली. बिंदू त्रिवेदी या माझ्या अंगावर धावून आल्या होत्या. त्याचा जाब विचारण्यासाठी मी गेले असता माजी नगरसेवक प्रवीण छेडा यांनी बिंदू त्रिवेदी यांचा बचाव करीत माझ्या परवानगीशिवाय माझा हात जोरात दाबून धरला व मला जागचे हलू दिले नाही. त्यामुळे माझ्या हाताला जबर दुखापत झाली व हात फ्रॅक्चर झाला. मी राजावाडी रुग्णालयात जाऊन उपचार घेतले, अशी माहिती रितू तावडे यांनी दिली आहे.

पूर्व नियोजित हल्ला – रितू तावडे

बिंदू त्रिवेदि या गेल्या २०१७ च्या निवडणुकीपासूनच माझ्याशी हटकून वागतात. गुरुवारी भाजपच्या बैठकीनंतर मी व माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट दोघेही बोलत असताना बिंदू त्रिवेदी या माझ्या अंगावर अचानकपणे धावून आल्या. यावेळी शाब्दिक चकमक आणि धक्काबुक्की झाली. मात्र त्यानंतर माजी नगरसेवक प्रवीण छेडा यांनी बिंदू त्रिवेदी यांचा बचाव करीत त्यांच्या गाडीत बसविले मात्र मी जाब विचारायला गेले असता माझ्या परवानगीशिवाय मला अडवून माझा हात जबरदस्तीने व जोरात दाबून ठेवला. त्यामुळेच माझ्या हाताला जबर दुखापत होऊन हाताला फ्रॅक्चर झाले आहे. ही घटना म्हणजे माझ्यावर करण्यात आलेला पूर्वनियोजित हल्ला होता. या घटनेचा मी तीव्र निषेध करीत आहे. या घटनेची पक्षाने, वरिष्ठ यांनी गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी व मला न्याय द्यावा, अशी मागणी माजी नगरसेविका रितू तावडे यांनी केली आहे.


हेही वाचा : ‘तुमचाही मुसेवाला होणार’ सलमानसह सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -