घरमुंबईबाळासाहेबांचा 'उत्तराधिकारी' हे उद्धव ठाकरेच - किशोरी पेडणेकर

बाळासाहेबांचा ‘उत्तराधिकारी’ हे उद्धव ठाकरेच – किशोरी पेडणेकर

Subscribe

''राज ठाकरे यांनी काल केलेल भाषण हे भारतीय जनता पार्टीने स्क्रीप्ट लिहून दिल्याप्रमाणे होतं", अशी टीका मुंबई महापलिकेच्या माजी महापौर व शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली. तसंच, "बाळा साहेबांचा पक्का 'उत्तराधिकारी' उद्धवजीच आहे हे आता सिद्ध झालंय", असंही त्यांनी म्हटलं.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) गुढीपाडवा मेळावा मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं पार पडला. यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. दरम्यान राज ठाकरेंच्या या भाषणावर आता सत्ताधारी शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. ”राज ठाकरे यांनी काल केलेल भाषण हे भारतीय जनता पार्टीने स्क्रीप्ट लिहून दिल्याप्रमाणे होतं”, अशी टीका मुंबई महापलिकेच्या माजी महापौर व शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली. तसंच, “बाळा साहेबांचा पक्का ‘उत्तराधिकारी’ उद्धवजीच आहे हे आता सिद्ध झालंय”, असंही त्यांनी म्हटलं.

रविवारी सकाळी दादरच्या शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन किशोरी पेडणेकर यांनी दर्शन घेतलं. यावेळी प्रसारमाध्यमांसी बोलताना त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कालच्या भाषणावर टीका केली. यावेळी त्या म्हणाल्या, “लाव रे तो व्हिडीओ गेला कुठे? असं लोकं आम्हाला सोशल मीडियावर विचारत आहेत. मुंबई देशभरात ही वाढती महागाई गगनाला पोहोचली. त्याच्याबद्दल त्यांच्या भाषणात अर्ध वाक्यही नव्हतं. याचा अर्थ उद्धव ठाकरे व शिवेसेनेचा द्वेश. याचसाठी स्वत:चे पक्ष काढले का? असा सवाल आता प्रत्येक शिवसैनिकाला पडायला लागला आहे. बऱ्याच मनसैनिकांनी सुद्धा या मुद्द्यावरुन आमच्याशी बातचीत केलीये. आम्हाला ही वाटलं होतं की, दोन वर्षाची मोरी तुंबलीये, या मोरीतून काहीतरी निघालय पण, भाजपाचे सगळे गांडुळ निघालेत”, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं.

- Advertisement -

”बाळासाहेबांनी अनेकांना घडवले, त्याच्यामागे हेही घडले पण हे कसे बिघडले हा मोठा प्रश्न पडायला लागलाय. घरच्यांचाही इतका द्वेश. हे म्हणजे महिलांच्या भांडणासारखं आहे. कालची बी कमीटी होती. एकतर भारतीय जनता पक्ष मांडिवरही घेत नाही, खांद्यावरही घेत नाही आणि त्यावेळी जे म्हणत होते मला घ्याना.. मला घ्याना, तो तुमचा प्रयत्न आहे”, असंही यावेळी किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं.

“मुंबई महाराष्ट्रात शिवसेनेचा द्वेशकरून आतापर्यंत कोणीही मोठे झाले नाहीत. कारण मुंबईकर किंवा महाराष्ट्राची जनता पुर्ण ओळखून आहे. आज आपण उद्धव ठाकरेंचे काम पाहत आहेत. जर दोन वर्ष फक्त यांच्या बोलण्याच्या मोऱ्या तुंबल्या, तर त्यावेळी आम्ही कामाच्या विकासाचा धडा लावला. तसंच, कोरोना कमी होताच क्षणी लोकार्पणाला सुरूवात केली. त्यामुळं दरवेळी उद्वेक आणि लोकांच्या मनात असतं, आता काय होणार? हे आता दिसायला लागलं आहे. बाळा साहेबांचा पक्का ‘उत्तराधिकारी’ उद्धवजीच आहे हे आता सिद्ध झालंय. लोकांना कुठेतरी किंतु-परंतु होतं. पण कालच्या राजकारणामुळं लोकांना कळलं की बाळासाहेबांचा पुत्र आणि नातू हेच ‘उत्तराधिकारी’ आहे, बाकी डुब्लिकेट लोकांचं काम नाही”.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या झालेल्या बैठकीवरही राज ठाकरे यांनी कालच्या भाषणात टीका केली. यावर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, मुळात तुमचा आणि तुम्हाला सांगण्याचा संबंध काय? ज्या पक्षाबरोबर ते ते युतीमध्ये होते, त्यापक्षामध्ये काय घडलं ते तेच सांगू शकतात. त्यामुळं उगाचच ‘आ भाई मला सांगा’, असं करण्यापेक्षा उद्धवजी व ठाकरे या नावाशी जर नाळ जोडलेली असती तर कदाचित हे प्रश्न उपस्थित झाले नसते.


हेही वाचा – कालचा शिवतिर्थावरचा भोंगा भाजपचा होता, संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -