राज ठाकरेंच्या भाषणामुळे बाळासाहेब ठाकरेंची आठवण झाली, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

chandrakant patil reaction on raj thackeray speechr eminded me of Balasaheb Thackeray

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरुन गुढीपाडवा मेळाव्यात संवाद साधताना हिंदुत्वाच्या मुद्दयावरुन महाविकास आघाडी सरकारवर घणाघात केला. राज ठाकरेंच्या वक्तव्यामुळे स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील हिंदूना आनंद वाटेल असे राज ठाकरे यांचे भाषण होते. मुस्लिम नागरिक या देशाचे आहेत त्यांनी आमच्या आरतीचा सन्मान करावा आम्ही त्यांच्या अझानचा करु असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांनी भारत हा स्वतःचा देश मानला पाहिजे असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली. राज ठाकरेंच्या भाषणामुळे स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आठवण झाली असे चंद्रकांत पाटील म्हणाले. सामान्य हिंदूला मनामध्ये आनंद होणारे भाषण झाले आहे. सकाळीसुद्धा एका कार्यक्रमात मांडले की, मला राज ठाकरेंचा एक शब्द आवडला की, मी धर्मांध नाही तर मी धर्माभिमानी आहे.

दरम्यान चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, आपल्या देशात ४७ नंतर सर्वधर्म समभाव, धर्मनिरपेक्षता याचे एकच स्तोम माजले की, हिंदूंना हिंदू म्हणून घेण्यास लाज वाटली, परंतु राष्ट्रीय स्वंय संघाकडे याचे श्रेय जाते की, १९२५ पासून सातत्याने हिंदूंना ही जाणी करुन देण्याचा प्रयत्न केला की, ५ हजार वर्षांपूर्वीचा उज्ज्वल तुमचा इतिहास आहे. ५०० वर्षांपासूनचा मुघलांचा तुमचा इतिहास नाही त्यामुळे हिंदू असल्याचा तुम्हाला अभिमान असला पाहिजे. त्यामुळे सातत्याने पुस्तकातून असे भासवण्याचा प्रयत्न झाला की, हिंदू म्हणजे बुरसटलेला. खरं तर हिंदू या शब्दामध्ये सर्वधर्म समभाव आहे.

राज ठाकरेंच्या भाषणातून बाळासाहेबांची आठवण

या देशातील मुस्लिम देशातून बाहेर जाऊ शकत नाही कारण या देशाचा तो नागरिक आहे. फक्त त्याने या देशाला स्वतःचा देश मानला पाहिजे बाजूच्या पाकिस्तानला नाही. त्याने या देशाबद्दल अभिमान बाळगला पाहिजे. देशातील सगळ्या योजना सगळ्यांना सारख्या असतात. यामुळे लांगुलचालन नको तर आदर करा, तुम्ही मस्जिदीमध्ये नमाज पढा आम्ही आमच्या मंदिरात प्रार्थना करतो. तुम्ही अझान म्हणत असाल तर आमची आरती आहे. आमच्या आरतीला तुम्ही सन्मान द्या आम्ही तुमच्या अझानला देतो. हिंदू म्हणजे बुरसटलेला आणि सनांना परवानगी नाही. बाकिच्या सर्व धर्मांना प्रतिष्ठा या मुद्यावर राज ठाकरे बोलले त्यातून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची आठवण झाली.

बाळासाहेब ठाकरेंची एक क्लिप काल पुन्हा दोन वेळा ऐकली ज्या प्रकारे सांगितले त्यांना मारण्यासाठी दाऊदची माणसं आली होती. ते म्हणाले की, पाहुणे आले होते, हॉटेलमध्ये राहिले आणि ते सन्मानपूर्ण विदेशात गेले, हिंमत असेल तर माझ्या अंगाला हात लावा असे बाळासाहेब ठाकरेंचे फार सुंदर भाषण आहे. राज ठाकरेंच्या भाषणामुळे ती जाणीव झाली. एकटे आम्ही म्हणत होतो की, तुम्ही विश्वास घात केला परंतु असे म्हणणारे आणखी कोणी निघाले आहे. अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंच्या भाषणावर दिली आहे.


हेही वाचा : कालचा शिवतिर्थावरचा भोंगा भाजपचा होता, संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका