घरमुंबईअकरावीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर

अकरावीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर

Subscribe

जाणून घ्या मुंबईतील महाविद्यालयाचा कटऑफ

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी पहिली गुणवत्तायादी आज सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात आली. या प्रक्रियेसाठी एकूण २ लाख ०३ हजार १२० विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. ज्यापैकी १ लाख २० हजार ५३८ विद्यार्थांना आपल्या आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला. कला शाखेत प्रवेश मिळवण्यासाठी एकूण १७ हजार ५७१ विद्यार्थांनी अर्ज केला होता. या अर्जदारांपैकी १२ हजार ६११ विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे महाविद्यालय मिळाले. विज्ञान शाखेसाठी ५४ हजार ७१५ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता यापैकी ३४हजार ८४० विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे महाविद्यालय मिळाले असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. विद्यार्थांनी निवडलेल्या महाविद्यालयामध्येच त्यांना प्रवेश घेणे बंधनकारक रहाणार आहे. आवडीचे महाविद्यालय न मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही या पूढे अर्ज करता येणार आहे. प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना ६ ते ९ जुलै दरम्यान महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांनी दुसऱ्या टप्प्यात निवडलेल्या महाविद्यालयामध्ये बदल करायचा असल्यास १० ते ११ जुलै या कालावधीत बदल करता येणार आहे.

मुंबईतील कनिष्ठ महाविद्यालयाची यादी

जय हिंद कॉलेज
कला ८५%
विज्ञान ८७.२%
वाणिज्य ८८.६%

- Advertisement -

एच आर कॉलेज
वाणिज्य ९२%

एन एम कॉलेज
वाणिज्य ९४.२%

- Advertisement -

रुपारेल कॉलेज
कला८६%
विज्ञान ८९.६%
वाणिज्य ९१. ८%

हिंदुजा कॉलेज
कला ७४.२%
वाणिज्य ८९.२ %
विज्ञान ८७%

रुईया कॉलेज
कला ९२.२ %
विज्ञान९३.२%

रुपारेल कॉलेज
कला- ८६%
विज्ञान९१.८%
वाणिज्य ८९.६%

वझे केळकर कॉलेज
कला ८६.८%
विज्ञान ९१. ८ %
वाणिज्य ९०.८%

मुलुंड कनिष्ठ महाविद्यालय
वाणिज्य ९१.४%

भवन्स कॉलेज (चौपाटी)
कला ७५.२%
वाणिज्य ८०.६%
विज्ञान ८२.४%

सेंट झेवियर्स कॉलेज
कला ९४.२%
विज्ञान : ९०.४ %

सीएचएम कॉलेज
कला ४६.६ %
वाणिज्य ९२ %
विज्ञान ८४.२%

बी.एन.बांदोडकर
विज्ञान ९१.८ %

पाटकर कॉलेज
वाणिज्य ८५ %

हिंदुजा कॉलेज
कला ७४.२ %
विज्ञान ८७ %
वाणिज्य ८९.२%

के सी कॉलेज
कला ८५%
विज्ञान ८७.२ %
वाणिज्य ८८. ६%

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -