घरCORONA UPDATECorona: कोरोनाग्रस्तांमध्ये जी-दक्षिण विभाग तर बाधित क्षेत्रांमध्ये डी विभाग आघाडीवर

Corona: कोरोनाग्रस्तांमध्ये जी-दक्षिण विभाग तर बाधित क्षेत्रांमध्ये डी विभाग आघाडीवर

Subscribe

मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या ७०० च्या घरात पोहोचलेली असून ज्या भागांमध्ये कोरोनाग्रस्त आढळून आलेले आहेत, त्या भागांना बाधित क्षेत्र म्हणून जाहीर

मुंबईतील वरळी, प्रभादेवी या जी-दक्षिण विभागातच सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्या असून बुधवारी संपूर्ण दिवसात ५१ रुग्ण वाढले आहे. त्यामुळे या विभागातील कोरोनाग्रस्तांची संख्या १८४ वर पोहोचली आहे. आतापर्यंत संपूर्ण मुंबईत ७०० एवढी झाली आहे. जी-दक्षिण विभागात सर्वाधिक रुग्ण असले तरी सर्वाधिक कंटेंमेटेड झोन अर्थात बाधित क्षेत्र हे मलबारहिल, वाळकेश्वर, ताडदेव, ऑपेराहाऊस या विभागाच्या डी विभागात आहे. या डी विभागात रुग्णांची संख्या ५३ एवढी असून बाधित क्षेत्रांची संख्या ४९ एवढी आहे.

- Advertisement -

मुंबईतील जी-दक्षिण विभागात वरळी कोळीवाडापाठोपाठ जनता कॉलनीत सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहे. त्याशिवाय आदर्शनगर, बीडीडी चाळ, पोलिस वसाहत या विभागांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर भायखळा, माझगाव, चिंचपोकळी या ई विभागाचा समावेश आहे. या विभागात ६४ रुग्ण आढळून आले आहे. त्यानंतर डी विभागात (५३ रुग्ण), विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम या के-पश्चिममध्ये (४६ रुग्ण), वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व या एच-पूर्वमध्ये (३७ रुग्ण), मालाड पी-उत्तर विभागामध्ये (३६ रुग्ण), देवनार,गोवंडी परिसरातील एम-पूर्व विभागात (२४ रुग्ण), भांडुप,कांजूरमार्ग,पवई,विक्रोळी या एस विभागात (२० रुग्ण), कांदिवली आर-दक्षिण विभागात (२० रुग्ण), देवनार, चेंबूर या एम-पश्चिम विभागात (२० रुग्ण), वांद्रे ते सांताक्रुझ पश्चिम या एच –पश्चिम विभागात (१९ रुग्ण), गोरेगाव या पी-दक्षिण विभागात (१८ रुग्ण), कुर्ला एल विभागात (१७ रुग्ण), बोरीवली आर-मध्य विभागात (१५ रुग्ण), घाटकोपर, विदयाविहार या एन विभागात (१५ रुग्ण), वडाळा, शीव या एफ-उत्तर विभागात (१५ रुग्ण), परळ, शिवडी, लालबाग या एफ-दक्षिण विभागात (१३ रुग्ण), माहिम, दादर, धारावी या जी-उत्तर विभागात (१२ रुग्ण), दहिसर या आर-उत्तर विभागात (०९ रुग्ण), चिराबाजार, चंदनवाडी, गिरगाव या सी विभागात (०९ रुग्ण), मुलुंड या टी विभागात (०७ रुग्ण), मस्जिद बंदर,डोंगरी या बी विभागात (०६ रुग्ण) तर कुलाबा, नरिमन पॉईंट, फोर्ट या ए विभागात (०६ रुग्ण) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.


…तर भायखळा, मलबारहिल परिसरात वाढू शकते कोरोना रूग्णांची संख्या!

मुंबईत एकूण ३८१ बाधित क्षेत्र

मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या ७०० च्या घरात पोहोचलेली असून ज्या भागांमध्ये कोरोनाग्रस्त आढळून आलेले आहेत, त्या भागांना बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. मुंबईत एकूण ३८१ क्षेत्र बाधित म्हणून जाहीर करण्यात आली असून यामध्ये डी विभागात सर्वाधिक बाधित क्षेत्र असून या विभागात ४९ बाधित क्षेत्र आहेत. के-पश्चिम : ४१, ई विभाग : ३३ एम-पश्चिम : २४, एम-पश्चिम : २४ बाधित क्षेत्र घोषित केली आहे.

वॉर्ड नुसार बाधित क्षेत्रांची संख्या

  • ए विभाग : ०३
  • बी विभाग : ०३
  • सी विभाग : ०५
  • डी विभाग : ४९
  • ई विभाग विभाग: ३३
  • एफ –दक्षिण विभाग : ११
  • एफ- उत्तर विभाग: ०५
  • जी-दक्षिण विभाग: १५
  • जी-उत्तर विभाग : ०५
  • एच-पूर्व विभाग: ०९
  • एच-पश्चिम विभाग: १४
  • के-पूर्व विभाग: २०
  • के-पश्चिम विभाग: ४१
  • पी-दक्षिण विभाग: ०९
  • पी-उत्तर विभाग : २३
  • आर-दक्षिण विभाग : १३
  • आर-मध्य विभाग : ११
  • आर-उत्तर विभाग : ०५
  • एल विभाग : १८
  • एम-पूर्व विभाग: २४
  • एम-पश्चिम विभाग: २४
  • एन विभाग : १६
  • एस विभाग : २३
  • टी विभाग : ३
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -