घरमुंबईपुरुषांचा मानसिक आधार 'हितगुज'

पुरुषांचा मानसिक आधार ‘हितगुज’

Subscribe

मानसोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशक हे मानसिक तणावाखाली असणाऱ्या लोकांचं समुपदेशन करुन त्यांना जगण्याचा मार्ग 'हितगुज' या हेल्पलाईनच्या माध्यमातून दाखवला जातो.

एका महिलेला तिचा नवरा सतत मारायचा. सततच्या घरगुती हिंसाचारातून ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाली होती. पण, तिला कोणीतरी ‘हितगुज हेल्पलाईन’बाबत माहिती दिली. जिथे मानसोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशक हे मानसिक तणावाखाली असणाऱ्या लोकांचं समुपदेशन करुन त्यांना जगण्याचा मार्ग दाखवतात. अगदी छोट्या घरगुती भांडणांपासून ते बिझनेसमध्ये झालेल्या तोट्यामुळे आलेल्या तणावापर्यंत सर्वच प्रकारच्या समस्येवर ‘हितगुज’ या हेल्पलाईनवरुन लोकांच्या समस्या सोडवल्या जातात. त्यानुसार, आतापर्यंत ‘हितगुज’ या हेल्पलाईनवर २७ हजारांपेक्षा जास्त फोन आले आहेत.

मानसिक तणावात मुंबईकर 

मनोरुग्ण, मानसिक तणावाखाली असलेले, त्यासोबतच बदलत्या जीवनशैलीमुळे होणारे आजार, कामाच्या व्यापामुळे येणारे नैराश्य यातून अनेकांचे मानसिक संतुलन ढासळते. अशा परिस्थितीत आपलं म्हणणं कोणाला सांगायचं हा प्रश्न समोर असतो. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने हितगुज हेल्पलाईन सुरू केली. या‘हितगुज’ हेल्पलाइनला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

- Advertisement -

१६ ते ३१ वयोगटातील नागरिकांची संख्या 

गेल्या ५ वर्षांत या हेल्पलाइनवर २७ हजारांपेक्षा जास्त जणांनी संपर्क साधला आहे. त्यात १६ ते ६१ वयोगटातील नागरिकांची संख्या अधिक आहे. शिवाय, त्यातही सर्वात जास्त पुरुषांचं प्रमाण आहे. कारण, आर्थिक समस्या ते जॉब सिक्युरिटीपर्यंत सर्वांनाच ताण आहे. त्यातही पुरुषांवर असणारी घराची जबाबदारी ही पारंपरिकरित्या आजही सुरू आहे. त्यामुळे तो ताण हा पुरुषांवर असतोच, असं हेल्पलाईनच्या प्रमुख आणि केईएम रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ विभागाच्या प्रमुख डॉ. शुभांगी पारकर यांनी सांगितलं आहे.

५ वर्षात २७ हजार कॉल्स 

मुंबईत सध्या तणावातून आत्महत्या होण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे, तणावात असणाऱ्या अशा रुग्णांसाठी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेऊन आत्महत्येपासून परावृत्त करता यावं, यासाठी ही हितगुज हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत या हेल्पलाइनवर मागील ५ वर्षांपासून २७ हजार १७८ मदतीसाठी कॉल्स आले आहेत. ‘हितगुज’ ही २४१३१२१२ या क्रमांकांची हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.

- Advertisement -

पुरुषांचं प्रमाण जास्त

या हेल्पलाइनवर फोन करणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त पुरुषांचा समावेश हे प्रमाण जवळपास ७० टक्के एवढं आहे. चिंतेतून झोप न लागणे, सतत काळजी वाटणे, वैवाहिक समस्या, कर्ज, नोकरी, मुलाच्या नोकरीबाबतची चिंता, प्रेम प्रकरण, मालमत्ता आदींबाबतच्या समस्यांबाबत या हेल्पलाइनवरुन सल्ला घेतला जातो.

सध्या कुठल्याही प्रकारच्या मानसिक तणावाचं जे प्रमाण आहे ते वाढलं आहे. यासाठी दिवसाला जवळपास १० ते १५ कॉल्स येतात. असे आठवड्याचे ९० ते १०० कॉल्स येतातच. यात १५ ते २० टक्के फॉलो अपचे रुग्ण असतात. ज्यात ही पुरुषांचं प्रमाण जास्त आहे. हितगुज ही अनामिक अशी सुविधा आहे. त्यातून कॉल केलेल्या व्यक्तीचं नाव कधीच पुढे येत नाही. त्यामुळे अत्यंत सुरक्षित अशी ही सेवा आहे. प्रत्येक प्रकारच्या मानसिक तणावाखाली असणाऱ्या व्यक्तीला हितगुजवर फोन करुन बोलता येते. त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांना पर्याय देणं हे ही महत्त्वाचं आहे. त्यामुळे कॉलवर उपस्थित असणाऱ्या समुपदेशकाला सर्वच प्रकारच्या भूमिका पार पाडाव्या लागतात. त्यांना त्यांचा हरवलेला विश्वास पून्हा मिळावा यासाठी प्रयत्न केले जातात.
– डॉ. शुभांगी पारकर, मानसोपचारतज्ज्ञ विभाग प्रमख, केईएम रुग्णालय

शिवाय, जे समुपदेशक मानसिक रुग्णांशी चर्चा करतात, त्यांना त्यांच्याशी कसं बोलायचं ? कसं वागायचं याचं ट्रेनिंग दिलं जातात. अनेकदा रुग्ण खूप चिडतात, अंगावर येतात. त्यामुळे त्यांना हाताळणं कठीण होतं, असेही डॉ. पारकर यांनी स्पष्ट केलं आहे.

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -