घरताज्या घडामोडीGhatkopar News : घाटकोपर येथे झोपड्यांवर दरड कोसळली

Ghatkopar News : घाटकोपर येथे झोपड्यांवर दरड कोसळली

Subscribe

पावसाळा दोन महिन्यांवर येवून ठेपला आहे. असे असताना घाटकोपर (पश्चिम), दातार कंपाऊंड हिमालय सोसायटी येथे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अचानकपणे काही झोपड्यांवर दरड कोसळण्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटनेची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तत्काळ बचावकार्य हाती घेतले.

मुंबई : पावसाळा दोन महिन्यांवर येवून ठेपला आहे. असे असताना घाटकोपर (पश्चिम), दातार कंपाऊंड हिमालय सोसायटी येथे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अचानकपणे काही झोपड्यांवर दरड कोसळण्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटनेची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तत्काळ बचावकार्य हाती घेतले.

प्राथमिक माहितीनुसार या घटनेत कोणी जखमी झाल्याचे वृत्त हाती आलेले नाही; मात्र अग्निशमन दलाने सुरक्षिततेच्या दृष्टीने घटनास्थळी जवळपास असलेल्या १० – १२ झोपड्या तत्काळ खाली केल्या आहेत. झोपडीत राहणाऱ्या नागरिकांची पालिकेकडून नजीकच्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याचे समजते. (Ghatkopar News A crack fell on huts in Ghatkopar)

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर (पश्चिम), गोविंद नगर, वाल्मिकी नगर, दातार कंपाऊंड येथील हिमालय सोसायटी नजीक असलेल्या झोपड्यांवर शुक्रवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे वातावरण असताना काही झोपड्यांवर अचानकपणे दरड कोसळली. त्याबरोबर मोठा आवाज झाला. झोपड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची एकच धावपळ झाली. स्थानिकांनी प्राथमिक बचावकार्य सुरू केले होते. मात्र कोणीतरी वर्दी देताच अग्निशमन दलाचे जवानही मदत घेवून तत्काळ घटनास्थळी हजर झाले. त्यांनी तत्काळ बचावकार्य युद्धपातळीवर हाती घेतले.

तसेच, पालिका वार्ड स्तरावरून कोसळलेल्या दरडीचा ढिगारा उचलण्यासाठी तत्काळ जे.सी.बी. कामगार, रुग्णवाहिका अशी मदत यंत्रणा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र अद्यापही कोणी जखमी झाल्याचे वृत्त हाती आलेले नाही. मात्र रात्री उशिरापर्यंत दरडीचा कोसळलेला ढिगारा उपसण्याचे व ढिगाऱ्यात कोणी व्यक्ती अडकले आहे का, याचा शोध घेण्याचे काम सुरू होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – BMC : मुंबईतील 10 हजार महिला बचतगटांची उत्पादने आता मोबाइल ॲपवर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -