घरआली दिवाळी २०१८दिवाळीत गिफ्ट म्हणून द्या ’गुडीज’

दिवाळीत गिफ्ट म्हणून द्या ’गुडीज’

Subscribe

दिवाळीच्या तयारीला वेग आला आहे. कुठे चकलीच्या भाजणीचा खमंग गंध, तर कुठे बेकरीत नानकटाई भाजतानाचा सुवास दरवळू लागला आहे. तर बाजारांमध्ये कपडे आणि नवीन वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. या सणासुदीला फराळ आणि इतर सजावटीसोबत सगळ्यात महत्वाचे असते ते ’गिफ्ट’. फराळ एकमेकांना देऊन दिवाळी साजरी करण्याचा काळ आता गेलाच. शिवाय ड्रायफ्रुट बॉक्सचा पर्यायही तसा काही नवीन राहिला नाही. म्हणूनच की काय आता गिफ्ट म्हणून ’गुडीज’ची जास्त चलती आहे. अनेक दुकानदारांनी आता हा पर्याय दिवाळी गिफ्टसाठी ठेवलेला पाहायला मिळतो.

काय आहेत या गुडीज ?
’गिफ्ट गुडीज’ हा प्रकार तसा नवीन नाही. एकाच बॉक्समध्ये चार ते पाच गोष्टींहून अधिक वस्तू असलेला हा प्रकार. मुळातच या गुडीज भरगच्च असल्यामुळे द्यायलाही भरगच्च आनंद होतो. शिवाय तुमच्या बजेटप्रमाणे गुडीज असेंबल करता येत असल्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी देखील त्यात भरू शकता.

- Advertisement -

फूड गुडीज
सुकामेवा आणि मिठाई विकणार्‍या दुकानांत गुडीजसाठी पर्याय निवडताना तुम्ही मिठाई, सुकामेवा आणि नमकीनचा प्रकार एकत्र करुन एक गुडीज बनवू शकता. विशेष म्हणजे या गुडीज बनवताना अनेक ठिकाणी खास दिवाळीसाठी या पदार्थांचे पॅकेट अगदी १०० ग्रॅमपासून उपलब्ध करुन दिले जाते. ते तुम्ही गुडीजमध्ये एकत्र करु शकता. फुड गुडीज करताना जर तुम्ही मिठाई, सुकामेवाचे गुडीज बनवत असाल तर त्यात चॉकलेट्स टाकू नका. त्याऐवजी चॉकलेट्सच्या वेगवेगळ्या प्रकाराचे एक वेगळं गुडीज बनवा. त्यात तुम्ही चॉकलेट सिरप, फ्रुट सिरप, ज्यूस असे एकत्र करुन गुडीज बनवू शकता. या गुडीज तुम्हाला ५०० रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंत बनवून मिळू शकतात.

डाएट स्पेशल गुडीज
जर तुम्हाला एखाद्या डाएट कॉन्शअस, जीम गोईंग व्यक्तीला गुडीज द्यायची असेल. तर तुम्ही स्पेशल गुडीज बनवू शकता. यात ओट्सचे वेगवेगळे प्रकार, लो कॅलरीज स्नॅक्स, हेल्थ ड्रिंक, प्रोटीन बार असे पर्याय निवडू शकता. हा कस्टमाईज किट असल्यामुळे तुम्ही १ हजार रुपयांपासून पुढील किंमतीत तो बनवून घेऊ शकता.

- Advertisement -

हटके गुडीज
ज्वेलरी, कपड्यांचीही गुडीज तुम्हाला बनवता येऊ शकते. हा एक हटके प्रकार असू शकतो. हल्ली मुलांसोबत मुलं देखील अ‍ॅक्सेसरीज वापरतात. तेव्हा ज्वेलरी स्पेशल अशी गुडीज देखील बनवता येऊ शकते. या शिवाय क्लॉथ गुडीज बनवताना स्कार्फ, दुपट्टा, कुर्ता यांचीही गुडीज बनवता येऊ शकते. फरक इतकाच की या गुडीजचे पॅकींग तुम्हाला इतर गुडीजसारखं करता येणार नाही. पण या गुडीज देखील यंदाच्या दिवाळीत हटके ठरू शकतात.

गुडीजचे पॅकींग
दिवाळी सुरू झाली की, तुम्हाला सगळ्या दुकानात वेताच्या काठ्यांपासून बनवलेले बास्केट, ट्रेज दिसतील. यात तुम्ही निवडलेल्या गुडीजच्या वस्तू ठेवून पॅकींग केले जाते. त्यावर डेकोरेटिव्ह फूले लावून सजावट केली जाते. त्यामुळे इतर कोणत्याही गिफ्टपेक्षा या गुडीज भरगच्च आणि उपयुक्त ठरतात. मग या दिवाळीत गिफ्ट देताना गुडीज देताय ना!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -