घरठाणेHarbor Railway : जम्बो मेगाब्लॉकनंतरही हार्बर मार्गावर प्रवाशांचे हाल सुरूच; आजही लोकल...

Harbor Railway : जम्बो मेगाब्लॉकनंतरही हार्बर मार्गावर प्रवाशांचे हाल सुरूच; आजही लोकल उशिरानेच

Subscribe

Harbor Railway : हार्बर रेल्वे मार्गावर रेल्वे प्रशासनाकडून 42 तासांचा मेगाब्लॉक घेतल्यानंतरही प्रवाशांचे हाल सुरुच असल्याचे आज पाहायला मिळत आहेत. सलग सुट्ट्यांनंतर आज कामावर निघालेल्या हार्बर मार्गावरील प्रवाशांना रेल्वेच्या बिघडलेल्या वेळापत्रकामुळे त्रास सहन करावा लागत आहे. (Harbor Railway Even after the jumbo megablock passengers continue to suffer on Harbor Railway Even today the local is late)

हेही वाचा – Ashwini Bindre massacre : खटला चालविण्यास सरकारी वकिलाचा नकार; बिंद्रेंच्या पतीकडून मुख्यमंत्र्यांना पत्र

- Advertisement -

पनवेल स्थानकात सकाळी झालेला तांत्रिक बिघाडा दुरुस्त झाला असला तरी सध्या हार्बर रेल्वेच्या वेळापत्रकावर याचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. सीएसएमटीच्या दिशेनं येणारी वाहतूक तब्बल 40 ते 45 मिनिटं उशीराने सुरू आहे. रेल्वेच्या बिघडलेल्या वेळापत्रकामुळे हार्बर स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. अर्ध्या तासाहून अधिक वेळ होऊनही लोकल येत नसल्यामुळे प्रवाशांनी कामावर न जाता घराची वाट धरली आहे. पनवेल स्थानकादरम्यान सकाळी 5.35 ते 7.25 या वेळेत तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे पनवेलकडे जाणाऱ्या हार्बर आणि ट्रान्सहार्बर उपनगरीय लोकल बेलापूर-पनवेल दरम्यान, 30 मिनिटे उशिराने धावत आहेत. मात्र वाशी आणि बेलापूरकडे जाणाऱ्या गाड्या योग्य वेळेत धावत आहेत.

5 दिवसांचा वाढीव रात्रकालीन ब्लॉक 

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसाठी अप आणि डाउन 2 नवीन लाईन्सच्या बांधकामासाठी उपनगरी यार्ड रीमॉडेलिंग कामासाठी हार्बर मार्गावर पनवेल ते बेलापूर रेल्वे स्थानकादरम्यान अभियांत्रिकी कामासाठी रेल्वेकडून 38 तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला होता. हा ब्लॉक नंतर 5 तासांनी वाढवला. असे असले तरी आता या मार्गावर पाच दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक सुरू आहे. 2 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबरपर्यंत ब्लॉकला सुरूवात झाली आहे. यामुळे लोकल ट्रेनच्या वाहतुकीतही बदल करण्यात आले आहे. ब्लॉक कालावधीत रात्री 12.30 ते 5.30 या ब्लॉक कालावधीत उपनगरीय सेवा रद्द राहतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईकरांनो ! आता अंधाराची चिंता नसावी, खारघर-विक्रोळीदरम्यान वीजवाहिनीचे काम पूर्ण

मालगाडीचे डबे घसरले

हार्बर मार्गावर घेण्यात आलेल्या 42 तासांच्या जम्बो मेगाब्लॉक आधी तीन दिवसांपूर्वीच म्हणजेच 30 सप्टेंबर रोजी पनवेल- कळंबोली रेल्वे स्थानकादरम्यान मालगाडी रुळावरून घसरून मोठा अपघात झाला होता. पनवेलहून वसईकडे जाणाऱ्या अप मार्गावर मालगाडीचे 4 वॅगन आणि ब्रेकव्हॅन रुळावरून घसरले होते. या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी पथकासह कल्याण आणि कुर्ला येथून accident रिलीफ ट्रेन घटनास्थळी पाठविण्यात आल्या. घसरलेले डब्बे रेल्वे रुळांवरुन बाजूला काढण्याचं, तसेच रुळ दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू झालं. या अपघातामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याचं मध्य रेल्वेनं स्पष्ट केलं होते. तसेच डब्बे घसरण्याचं कारण काय याच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहे. मात्र, या अपघातामुळं मेल-एक्सप्रेस रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडून पडले असून प्रवाशांना गैरसोयीला सामोरं जावं लागलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -