घरCORONA UPDATE१४ एप्रिलनंतर निर्बंध उठणार? वाचा काय म्हणतायत आरोग्यमंत्री!

१४ एप्रिलनंतर निर्बंध उठणार? वाचा काय म्हणतायत आरोग्यमंत्री!

Subscribe

येत्या १४ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनची मुदत संपुष्टात येत आहे. केंद्र सरकारकडून देखील वेळोवेळी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, असं स्पष्ट केलं आहे. मात्र, तरीदेखील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ज्या वेगाने वाढत आहे, ते पाहाता हा कालावधी वाढण्याचीच शक्यता अधिक असल्याचं म्हटलं जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ‘१४ एप्रिलनंतर राज्यातल्या स्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊनबाबत पुनर्विचार केला जाईल. पण १४ एप्रिलनंतर आपल्यावरचे निर्बंध कमी करायचे की नाही, हे लोकांनी शिस्त पाळण्यावर अवलंबून असणार आहे’, असं राजेश टोपे म्हणाले आहेत. शनिवारी संध्याकाळी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी लोकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

लोकांनी शिस्त पाळली, तरच निर्बंध शिथिल!

सध्या लॉकडाऊनमुळे नागरिक घरातच अडकले आहेत. त्यामुळे सगळेच लॉकडाऊन संपण्याची वाट पाहात आहेत. त्यामुळे १४ एप्रिलला लॉकडाऊनची मुदत संपल्यानंतर काय होईल? याची शंका प्रत्येकालाच आहे. त्याबाबत बोलताना राजेश टोपे म्हणाले, ‘कोरोनाविरोधातल्या लढ्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळत घरीच थांबणं हा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या लाईव्हमध्ये म्हणाले आहेत की १४ एप्रिलनंतर टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करता येतील का त्यावर विचार सुरू आहे. पण लोकांनी शिस्त पाळली, तरच हे शक्य आहे.’

- Advertisement -

कटिबद्ध राहून काम करावं लागेल!

यावेळी राज्यातल्या कंटेनमेंट झोनविषयी देखील राजेश टोपेंनी माहिती दिली. ‘एकट्या मुबंईत २९० कंटेनमेंट झोन असून त्यामध्ये आरोग्य सेवक काम करत आहेत. नागरिकांनी त्यांना सहकार्य करायला हवं’, असं सांगतानाच ‘मी घरी थांबणार, मी कोरोनाला हरवणार, मीच माझा रक्षक, या विचाराने आपल्याला कटीबद्ध राहून काम करावं लागेल, अशीच माझी या निमित्ताने विनंती आहे’, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -