घरमुंबईमुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस

Subscribe

मुंबईसह कोकणांत पावसाचा जोर वाढला असून मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे.

गेल्या काही दिवसांपासूनच्या विश्रांतीनंतर सोमवारी पावसाने पुन्हा एकदा जोरदार आगमन केले आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि कोकणांत पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईत काल रात्रीपासून पाऊस पडत असल्यामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईसह उपनगरात पडणाऱ्या पावसामुळे दादर, हिंदमाता, अंधेरी, सांताक्रुझ, मीरा रोड, वसई कल्याण, डोंबिवली, ठाणे, सायन आणि नवी मुंबई या ठिकाणी पाणी साचले आहे.

तीन दिवस मुसळधार पाऊस

मुंबईसह कोकणांत पावसाचा जोर वाढला असून गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातही पावसाने दमदार हजेरी लावली असून पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

- Advertisement -

पावसामुळे मध्य रेल्वे उशीराने

सोमवारी रात्री पाऊस पडणाऱ्या पावसाचा रेल्वेला फटका बसला आहे. पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. १५ ते २० मिनिटे वाहतूक उशीराने असल्यामुळे प्रवाशांना याचा फटका बसत आहे. शनिवार, रविवार आणि बाप्पाचे आगमन अशा तीन दिवसाच्या सुट्टीनंतर कामावर जाणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसला आहे. त्यामुळे ऐन कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.


हेही वाचा – मुंबईतल्या बाप्पालाही सांगली- कोल्हापूरच्या पुराचा फटका!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -