घरमुंबईभाजपची खेळी, रात्रभर मशीनमध्ये सेटिंग - आमदार हितेंद्र ठाकूर

भाजपची खेळी, रात्रभर मशीनमध्ये सेटिंग – आमदार हितेंद्र ठाकूर

Subscribe

रात्रभर मशीनमध्ये सेटिंग झाली असून भाजप रडीचा डाव खेळत असल्याची टीका बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष, आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आज केली. प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या बाजूने असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पालघर पोटनिवडणूकीसाठी आज पालघर, डहाणू, विरारमध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे. याकरता सकाळीच बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर पत्रकारांशी संवाद साधताना हितेंद्र ठाकूर यांनी भाजपवर थेट आरोप केला.

प्रशासनाला हाताशी घेत भाजपचा डाव
बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व असलेल्या ठिकाणी जाणीवपूर्वक ईव्हीएम मशीन्स बंद ठेवण्यात आल्या. आम्हाला मतदान होऊ नये याकरता सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला हाताला धरून असा प्रयत्न केला जात मुद्दामहून हा डाव रचल्याचा खळबळूजनक आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला. अनेक सोसायटींमध्ये भाजपाचे पदाधिकारी फोन करून नागरिकांना अमिष दाखवत आहेत. काही भागात पेट्रोल एक रूपयांनी स्वस्त विकले जात आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. माध्यम प्रतिनिधींचे फोन गेल्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली. प्रशासनाला हाताला धरून भाजपा रडीचा डाव खेळत आहे. मध्यरात्री अधिकारी मशीनमध्ये कसले सेटिंग करत होते, असे ठाकूर यांनी यावेळी म्हटले.

- Advertisement -

ईव्हीएम मशीनबाबत साशंकता कायम
पालघर पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. श्रीनिवास वनगा (शिवसेना), राजेंद्र गावित (भाजपा), दामू शिंगडा (काँग्रेस), बळीराम जाधव (बविआ), किरण गहला (मार्क्सवादी) यांच्यामध्ये मुख्य पंचरंगी लढत आहे. मात्र शिवसेना भाजपाने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली असून, प्रचारात दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते. आता बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी थेट मतदानादिवशीच ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली.

पोटनिवडूणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून, २०९७ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पोटनिवडणुकीकरिता १२ हजार ८९४ कर्मचारी, तसेच ४ हजार २१९ सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. तरी देखील भाजपा साम दाम दंडचा वापर करत असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला आहे.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -