मुंबईतील किती मुली हरवल्या? राज्य सरकारने मांडली आकडेवारी

मुंबई शहरात हरवलेल्या मुलींबाबतची माहिती राज्याच्या गृह विभागाने आज सभागृहात सादर केली. विधान परिषदेच्या सदस्या मनिषा कायंदे यांनी मांडलेल्या माहितीनुसार बोईसर येथील एक मुलगी महिन्याभरापासून मिसिंग झाल्याची घटना वांद्रे येथे घडली होती. त्यानंतरच राज्यात हरवलेल्या मुलींची आकडेवारी त्यांनी सभागृहाकडे मागितली. वर्षनिहाय मुली हरवण्याच्या घटनांमध्ये घट झाली आहे अशी माहिती गृह विभागाच्या वतीने सतेज पाटील यांनी दिली.
वर्ष २०१९ मध्ये १४८२ मुली हरवल्याची प्रकरणे उघडकीस आली होती. त्यामध्ये १४०० प्रकरणांमध्ये मुलींचा शोध लागला. २०२० मध्ये ८८९ प्रकरणांमध्ये ८४७ मुलींचा शोध लागला. तर २०११ मध्य ११५८ प्रकरणात १०४४ मुलींचा शोध लावण्यात गृह विभागाला यश आले. मुस्कान ऑपरेशनच्या माध्यमातून हा शोध लावला असल्याची माहिती देण्यात आली.
राज्यात सायबर बुलिंगच्या घटना पाहता फेसबुक आणि इन्स्टाग्राम यासारख्या सोशल मिडिया साईट्सची मदतराज्य सरकारने घ्यावी अशी मागणी मनिषा कायंदे यांनी केली. त्यासोबतच मुंबईतील सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करण्याची मागणीही त्यांनी केली. मुंबईत ५ हजार सीसीटीव्हीची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यापैकी ३ हजार कॅमेरे लावण्यात आले आहेत. उर्वरीत कॕमेरा लवकरच लावण्यात येतील असेही सतेज पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा – Maharashtra Assembly Winter Session 2021: विधानसभेत शक्ती विधेयक एकमतानं मंजूर