घरमुंबई'हाऊसफुल्ल ४' चे चित्रीकरण संपन्न!

‘हाऊसफुल्ल ४’ चे चित्रीकरण संपन्न!

Subscribe

'हाऊसफुल्ल ४' चित्रपटाचे चित्रीकरण संपन्न झाले असून यामधील कलाकारांचा ग्रुप फोटो अभिनेता अक्षय कुमार याने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

बॉलीवूड चित्रपट सीरीजमध्ये समावेश असलेल्या ‘हाऊसफुल्ल ४’ चित्रपटाचे चित्रीकरण संपन्न झाले असून यामधील कलाकारांनी ग्रुप फोटो काढला आहे. अभिनेता अक्षय कुमार याने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून अभिनेत्री क्रिती सिनॉन, पूजा हेगडे यांनी त्यांना रिट्विटही केले आहे. यामध्ये ‘हाऊसफुल्ल ४’ चे चित्रीकरण पूर्ण झाले असून आता आम्ही त्याच्या प्रदर्शनासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे. हा चित्रपट पुढील वर्षी दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisement -

वाचा : ‘हाऊसफुल्ल ४’ च्या ज्युनिअर आर्टिस्टनेही केला विनयभंगाचा आरोप

 

- Advertisement -
kriti senon tweet
अभिनेत्री क्रीती सिनॉनचे ट्विट

वाचा : #MeToo नाना पाटेकरांना धक्का; ‘हाऊसफुल्ल ४’ मधून दिला डच्चू!

वाचा : #MeToo : साजिद खान, आलोकनाथ यांना नोटीस

यामुळे चित्रपट चर्चेत 

मीटू चळवळीत दिग्दर्शक साजिद खानचेही नाव समोर आले होते. त्यानंतर साजिद खान स्वतःहून या चित्रपटाच्या दिग्दर्शनापासून दूर झाला. तर अक्षय कुमारने घेतलेल्या पवित्र्यामुळे नाना पाटेकर यांना ‘हाऊसफुल्ल ४’ मधून डच्चू देण्यात आला होता. त्यामुळे या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होणार यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. परंतू आता हा चित्रपट पूर्ण झाला असून दिवाळी २०१९ मध्ये प्रदर्शीत होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -