घरताज्या घडामोडीप्लास्टिकविरोधी मोहिमेकडे दुर्लक्ष; संबंधित पालिका अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

प्लास्टिकविरोधी मोहिमेकडे दुर्लक्ष; संबंधित पालिका अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

Subscribe

मुंबई महापालिकेकडून प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात धाडसत्र व कारवाई जोमात सुरू आहे. मात्र, पालिकेच्या काही विभागात संबंधित अधिकाऱ्यांकडून प्लास्टिक विरोधी कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ते संबंधित अधिकारी प्रशासकीय रडारवर आले आहेत.

मुंबई : मुंबई महापालिकेकडून प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात धाडसत्र व कारवाई जोमात सुरू आहे. मात्र, पालिकेच्या काही विभागात संबंधित अधिकाऱ्यांकडून प्लास्टिकविरोधी कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ते संबंधित अधिकारी प्रशासकीय रडारवर आले आहेत. त्यामुळे यापुढे अशा गंभीर प्रकरणाची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे, असा इशारा दिल्याचे पालिकेचे उपायुक्त संजोग कबरे यांनी सांगितले. (Ignoring the anti plastic campaign Action on the concerned bmc officials)

मुंबई महापालिकेने २६ जुलै २००५ च्या पूरस्थितीला अतिवृष्टी, मोठी समुद्र भरती प्रमाणेच नद्या, नाल्यात वाहून आलेल्या प्लास्टिक पिशव्या म्हणजे प्लास्टिकसुद्धा कारणीभूत होते. त्यामुळे पालिकेने प्लास्टिक पिशव्यांविरोधात विशेषतः प्रतिबंधित प्लास्टिक व पिशव्यांच्या विरोधात सध्या धाडसत्र व कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. पालिकेने सदर मोहिमेअंतर्गत चांगली कारवाई करून जुलै ते आतापर्यंतच्या ३८३ प्रकरणात २,११५ किलो प्लास्टिक जप्त केले असून १९ लाख २० हजार रुपये दंडही वसूल केला आहे. तसेच, ८ जणांविरोधात कायदेशीर कारवाईसुद्धा करण्यात आली असल्याचे उपायुक्त संजोग कबरे यांनी सांगितले.

- Advertisement -

मात्र मुंबईतील काही विभागात सदर कारवाईबाबत दुर्लक्ष होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. याची गंभीर दखल घेत प्रशासनाने आता संबंधित अधिकाऱ्यांवर आणखीन बारीक नजर ठेवून कारवाईचा इशारा दिला आहे.

मध्यंतरी म्हणजे मार्च २०२० पासून मार्च २०२२ पर्यंत मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव होता. या कोरोनामुळे पालिकेच्या प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाईचा वेग काहीसा थंडावला होता. मात्र जुलै महिन्यापासून पालिकेने प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात पुन्हा एकदा कारवाईसाठी मोहीम सुरू केली आहे. मात्र या करवाईकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात पालिका प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – धुळ्याच्या तरुणाचा मुंब्रा रेल्वेस्थानकातील भीषण अपघातात दुर्देवी मृत्यू

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -