घरमुंबईबेकायदा वाहतुकीचा रिक्षा व्यवसायावरही परिणाम

बेकायदा वाहतुकीचा रिक्षा व्यवसायावरही परिणाम

Subscribe

 परवान्याच्या खिरापतीमुळे रिक्षा ठरतेय शिक्षा

शहरातील बेकायदेशीर वाहतुकीचा केवळ परिवहन सेवेलाच नव्हे, तर रिक्षा व्यवसायालाही फटका बसला आहे. घोडबंदर ते कोपरी मार्गावर दिवसभरात शेकडो बस गाड्या बेकायदेशीर वाहतूक करीत असतात.काही दिवसांपूर्वी रिक्षाचालकाला दिवसाकाठी ७०० ते ८०० रूपये मिळत होते. आता संपूर्ण दिवसभर रिक्षा चालवूनही जेमतेम ३०० ते ४०० रूपये त्यांच्या हाती पडतात. त्यामुळे आता रिक्षा व्यवसाय पूर्वीसारखा फायदेशीर ठरलेला नाही, अशी खंत रिक्षा चालकांनी व्यक्त केली. शनिवारी शिवाईनगर येथे रिक्षा टॅक्सी संघटनेचा मेळावा पार पडला.

या मेळाव्यात ठाण्यातील अनेक रिक्षा चालकांनी सद्यस्थितीत रिक्षा व्यवसाय करणे कसे कठीण आहे, याचा पाढाच वाचला.
शासनाच्या नवीन धोरणामुळे मागेल त्याला परवाना मिळत असल्याने गेल्या पाच वर्षात ठाणे परिवहन क्षेत्रामध्ये रिक्षांची संख्या प्रचंड वाढली आहे. परिणामी कमाई कमी झाली आहे. काही वर्षांपूर्वी अनेक सुशिक्षित बेरोजगार या व्यवसायाकडे वळले. पतपेढी अथवा महामंडळांकडून कर्ज घेऊन रिक्षा घेतली तसेच परवानाही काढला. त्यावेळी एक लाखाहून अधिक रक्कम परवाना काढण्यासाठी दिल्याचे काही जुन्या रिक्षाचालकांनी सांगितले. मात्र आता 15 ते 20 हजारात परवाना मिळत असल्याने अनेकजण या व्यवसायाकडे वळले आहेत. वाढलेल्या रिक्षांमुळे तासनतास एकाच ठिकाणी थांबावे लागते. दोन प्रवासी बसले असतानाच खाजगी बस आली की ते बसमध्ये निघून जातात. पुन्हा रिक्षा भरण्याची वाट पहात थांबावे लागते. त्यामुळे पूर्वीसारखी कमाई होत नाही. आजच्या स्थितीत बँकेचा हप्ता भरण्याइतकीही कमाई होण्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिणामी सध्या रिक्षा व्यवसाय अधिकाधिक नुकसानीचा ठरू लागला आहे.

- Advertisement -

तीन वर्षात दुपटीने वाढ
2017 च्या जून महिन्यात परिवहन विभागाने रिक्षा परवाने खुले केले आणि मागेल त्याला रिक्षा परवाना मिळू लागला. 2017 मध्ये 10 हजार 210, 2018 मध्ये 15 हजार 121 रिक्षांना वाहतूक परवाना देण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांत रिक्षांची आकडेवारी दुप्पटीने वाढली आहे.

अन्यथा आत्महत्या करावी लागेल
ऑटो रिक्षा-टॅक्सी व्यावसायिकांच्या शासन दरबारी प्रलंबित असलेल्या न्याय्य मागण्या सोडविण्यासाठी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने राज्य शासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही त्या सोडविण्यासाठी शासनाचा परिवहन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. रिक्षा टॅक्सी व्यवसायावर दिवसेंदिवस येणाऱया नवीन संकटामुळे हा व्यवसाय पूर्णपणे डबघाईस आला आहे. शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे भविष्यात रिक्षा, टॅक्सी व्यवसायिकांना शेतकरी बांधवांसारख्या आत्महत्त्या करण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.
विनायक लक्ष्मण सुर्वे
ठाणे शहर रिक्षा-टॅक्सी संयुक्त कृती समिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -