घरमुंबई'स्वाईन फ्लू' रुग्णांची संख्या घटली !

‘स्वाईन फ्लू’ रुग्णांची संख्या घटली !

Subscribe

२०१८ या चालू वर्षातील जून आणि जूलै महिन्यात, सुदैवाने एकाही स्वाईन फ्लूच्या रुग्णाची नोंद झाली नाहीये.

पावसाळ्यात साथीच्या आजारांसह व्हायरल इन्फेक्शन झालेल्या रुग्णांमध्ये वाढ होते. पोटदुखी, डोकेदुखी, पाठदुखी अशा  समस्या पावसाळ्यात हमखास उद्भवतात. मात्र, दरवर्षींच्या तुलनेत यंदाच्या वर्षी महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. याउलट गेल्या वर्षी म्हणजेच २०१७ मध्ये एच१ एन१ (स्वाईन फ्लू) च्या एकूण ९९५ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर १८ लोकांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला होता. गेल्या वर्षीच्या जून महिन्यात स्वाईन फ्लूचे ३१३ केसेसची नोंद झाली होती. जुलै महिन्यात २५० रुग्णांची आणि ५ मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, यावर्षी या नोंदणीमध्ये सकारात्मक घट झाल्याचं समोर आलं आहे. साल २०१६ मध्ये फ्लूचे फक्त ३ रुग्ण आढळले होते तर ५८ जणांचे बळी गेले होते. मात्र, २०१८ या चालू वर्षातील जून आणि जूलै महिन्यात एकाही स्वाईन फ्लूच्या रुग्णाची नोंद करण्यात आली नाहीये.

याविषयी माहिती देताना पालिकेच्या आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितलं, “स्वाईन फ्ल्यू हा हवेतून पसरणारा रोग आहे. यंदा रुग्णांची संख्या घसरणीसाठी काही वेगळं केलेलं नाही. दरवर्षी पावसाळ्यात स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळतात. त्यामुळे गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती, किडनीचे आजार असलेले आणि ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असते अशांना आम्ही विशेष काळजी घेण्याचं आवाहन करतो. शिवाय आपातकालीन परिस्थितीत पुरेल एवढा औषधांचा साठा ठेवतो.”

- Advertisement -

स्वाईन फ्ल्यूची लक्षणे

ताप, सर्दी, डोकेदुखी, श्वसनाचा त्रास उद्भवतो. या आजारांचा प्रभाव किमान ७ ते १० दिवस राहतो. स्वाईन फ्ल्यू व्यक्तीच्या शिंकण्यातून किंवा खोकल्यातून पसरु शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -