घरमुंबईतर वेळप्रसंगी शिवसेनेला पाठिंबा देऊ - नवाब मलिक

तर वेळप्रसंगी शिवसेनेला पाठिंबा देऊ – नवाब मलिक

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार नवाब मलिक यांनी राज्यात सरकार पडल्यास वेळप्रसंगी शिवसेनेला पाठिंबा दिला जाईल, असे सांगत नवा ट्विस्ट निर्माण केला आहे.

मुख्यमंत्री कोणाचा यावरून सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये ‘तू तू मैं मैं…’ सुरू असताना आता यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने देखील उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार नवाब मलिक यांनी राज्यात सरकार पडल्यास वेळप्रसंगी शिवसेनेला पाठिंबा दिला जाईल, असे सांगत नवा ट्विस्ट निर्माण केला आहे. दरम्यान, शिवसेना राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सकाळी ‘आमच्याकडे पर्याय आहेत. परंतु अन्य पर्याय वापरून पाप करू इच्छित नाही. शिवसेनेला सत्तेची भूक नाही. या प्रकारच्या राजकारणापासून शिवसेनेने नेहमीच स्वत:ला दूर ठेवले आहे. ‘येथे दुष्यंत नाही, ज्यांचे वडील तुरूंगात आहेत. आम्ही येथे आहोत, आम्ही धोरण, धर्म आणि सत्याचे राजकारण करतो. काँग्रेस कधीही भाजपबरोबर जाणार नाही, असे सांगत भाजपला इशारा दिला होता.

काय म्हणाले मुख्यमंत्री 

सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही महायुतीचेच सरकार स्थापन करू, असा विश्वास असल्याचे सांगत भाजपच्या नेतृत्वातच सरकार स्थापन होईल. तसेच उद्याच्या बैठकीत विधिमंडळ नेता निवडला जाईल, असे देखील त्यांनी सांगितले आहे. तसेच प्लॅन बी कुठलाही नाही, प्लॅन ए तयार आहे, तोच यशस्वी ठरणार, असेदेखील त्यांनी सांगितले. एवढेच नाही तर फर्स्ट मेरिटपेक्षा आम्ही फर्स्ट क्लास फर्स्ट पास झालो याचे समाधान असल्याचे ते यावेळी गप्पामध्ये म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा –

सत्तेचे समसमान वाटप हा मुख्यमंत्र्यांचा शब्द – संजय राऊत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -