घरमुंबईजोगेश्वरीतील कोकणी-मालवणी जत्रोत्सवाचे आमदार रवींद्र वायकरांच्या हस्ते उद्घाटन

जोगेश्वरीतील कोकणी-मालवणी जत्रोत्सवाचे आमदार रवींद्र वायकरांच्या हस्ते उद्घाटन

Subscribe

जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रामध्ये गेल्या 30 वर्षापासून अविरतपणे आयोजित करण्यात येणारी कोकणी-मालवणी जत्रा ही आकर्षणाचे केंद्र असते.

कोकणी – मालवणी सुका मेवा, हाताने बनविलेले दागिने, कपडे, खवय्यांसाठी कोकणी व मालवणी तसेच अन्य खाद्यपदार्थ, बच्चे मंडळींसाठी विविध प्रकारचे पाळणे, खेळणी, रेलगाडी, चक्करडे, कोकणस्थ लोकांच्या आवडीचे दशावतारी नाटकांचे खेळ , बुवा सुजाता पाटणकर (डोंबिवली) व बुवा दर्शना म्हसकर (वांगणी) यांच्या भजनाची डबलबारी अशा वैशिष्ट्यपूर्ण पंचपक्वान्नाची व खमंग मेजवणीची लज्जत चाखण्याची संधी कोकणस्थ लोकांसाठी आणि समस्त मुंबईकरांसाठी उपलब्ध झाली आहे. निमित्त आहे ते शामनगर तलाव, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड, जोगेश्वरी (पूर्व) येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या भव्य कोकणी-मालवणी जत्रोत्सवाचा जनता आनंद घेत आहे. (Inauguration of Konkani-Malvani jatra in Jogeshwari by MLA Ravindra Vaikar)

4 ते 13 नोव्हेंबर असे सलग 10 दिवस ह्या जत्रोत्सवाचा आनंद जत्राप्रेमींना दररोज सायंकाळी 6 ते रात्री 10 या कालावधीत लुटता येणार आहे. जोगेश्वरी विभागातील नागरिकांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या पुढाकाराने सालाबादप्रमाणे या वर्षीही ‘भव्य कोकणी-मालवणी जत्रोत्सव’ शामनगर तलाव, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड, जोगेश्वरी (पूर्व) येथे 4 ते 13 नोव्हेंबर या कालावधीसाठी आयोजित करण्यात आलेला आहे. या जत्रोत्सवाचे उदघाटन आ. वायकर यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी मोठ्या दिमाखात व उत्साहात करण्यात आले.

- Advertisement -

जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रामध्ये गेल्या 30 वर्षापासून अविरतपणे आयोजित करण्यात येणारी कोकणी-मालवणी जत्रा ही आकर्षणाचे केंद्र असते. या जत्रेची जोगेश्‍वरीकर तसेच अन्य तालुक्यातील रहिवाशी चातकाप्रमाणे वाट बघत असतात. त्यामुळे अगदी जत्रेच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत या जत्रेला कोंकणी जनतेची व समस्त मुंबईकरांची गर्दी दररोज बघायला मिळणार आहे.

यंदाच्या जत्रेत विविध वस्तू, कोंकणी खाद्यपदार्थ व इतर चीजवस्तू आदींची उपलब्धता असलेले 75 स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यामध्ये, अस्सल कोकणी मालवणी सुका मेवा, हाताने बनविलेले दागिने, कपडे, कोकणी व मालवणी तसेच अन्य खाद्यपदार्थांचे स्टॉल्स बघायला मिळणार आहेत. बच्चे मंडळींसाठी विविध प्रकारचे पाळणे, खेळणी, रेलगाडी, चक्करडे, आदीं खेळणी असणार आहेत. जत्रेला येणार्‍या हजारो जत्रेकरुंसाठी खासकरुन कोकणातून आलेली दशावतारी नाटकांचे खेळ दरदिवशी सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत पार पडणार आहेत. एवढेच नव्हे तर बुवा सुजाता पाटणकर (डोंबिवली) व बुवा दर्शना म्हसकर (वांगणी) यांच्या भजनाची डबलबारी, मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोकयात्रा या लोककलेच्या रंगतदार कार्यक्रमाचाही समावेश आहे.

- Advertisement -

शुक्रवारी या जत्रेचे उद्घाटन आमदार रवींद्र वायकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विधानसभा संघटक विश्‍वनाथ सावंत, महिला विधानसभा संघटक रचना सावंत, शालिनी सावंत, माजी नगरसेवक बाळा नर, रेखा रामवांशी, विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर, बावा साळवी, उपविभाग प्रमुख कैलाशनाथ पाठक, बाळा साटम, जयवंत लाड, जितेंद्र वळवी, शाखा प्रमुख नंदु ताम्हणकर, आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.


हे ही वाचा – देवेंद्र फडणवीसांनी सांगितला उदय लळीत यांचा ‘फिटनेस फंडा’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -