घरदेश-विदेशदेवेंद्र फडणवीसांनी सांगितला उदय लळीत यांचा 'फिटनेस फंडा'

देवेंद्र फडणवीसांनी सांगितला उदय लळीत यांचा ‘फिटनेस फंडा’

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदय लळीत यांचा फिटनेस फंडा सांगितला

मुंबईतील राजभन येथे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उद्या लळीत यांचा सत्कार समारंभ सोहळा झाला. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagatsingh koshyari) उपस्थित होते. राजभवनातील दरबार हॉल मध्ये सरन्यायाधीशांच्या सत्कार समारंभ झाला राज्याचे राजपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उदय लळीत (uday lalit) यांचा सत्कार करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदय लळीत यांचा फिटनेस फंडा सांगितला

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”उदय लळीत हे नेहमीच आनांदात असतात.आधी आम्ही त्यांच्या घरी जायचो. खूप वेळ आमच्या गप्पा व्हायच्या. सुप्रीम कोर्टाच्या शेजारीच उदय लळीत ऑफिस आहे. दिवसातून अनेकदा त्यांच्या ऑफीस मध्ये जाणं व्हायचं तेव्हा आम्ही सगळे लिफ्टने ऑफिस मध्ये जायचो पण उदय लळित मात्र जिने चढून ऑफिस मध्ये यायचे. तेव्हाच माझ्या लक्षात आलं की हाच उदय लळीत यांच्या फिटनेसचा फंडा आहे. उदय तेव्हा जसे दिसायचे तसेच ते आता २२ वर्षे झाली तरीही ते तसेच दिसतात”. असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीसांचे हे शब्द ऐकून प्रेक्षागृहातून टाळ्यांचा कडकडाट ऐकू आला.

- Advertisement -

उदय ललित यांनी जे योयदान दिले ते अत्यंत्य महत्वाचे आहे. त्यामूळेच न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये परिवर्तन सुद्धा पाहायला मिळतं. ज्यावेळी मी सर्वांचा आढावा घेतो तेव्हा असं जाणवतं की आपल्या समोर खूप आव्हानं आहेत त्यामूळेच न्यायदानाची प्रक्रिया आणखी वेगवान कशी करता येईल याकडेही आमचा नेहमीच कल असतो. असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.


हे ही वाचा –  हिवाळी अधिवेशन १२ डिसेंबर पासून?

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -