घरमुंबईमुंबईत पुन्हा वाढू लागले कोरोना रुग्ण; ICU, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर्सची संख्या वाढवली

मुंबईत पुन्हा वाढू लागले कोरोना रुग्ण; ICU, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर्सची संख्या वाढवली

Subscribe

मुंबईत मागील महिन्यापर्यंत नियंत्रणात असलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या मागील पंधरा दिवसांपासून वाढू लागली आहे. आतापर्यंत दररोज आढळून येणाऱ्या ९०० ते १२०० रुग्ण संख्येच्या तुलनेत आता २२०० ते २२५० रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे १५ जून नंतर कोविड रुग्णालय आणि समर्पित कोविड आरोग्य केंद्रातील रिकाम्या खाटा आता भरू लागल्या आहेत. अनेक रुग्णालयात आयसीयू बेड, ऑक्सिजन बेड तसेच व्हेंटिलेटर्सची कमतरता भासू लागली असून त्यामुळे महापालिकेनेही मागील दहा दिवसांमध्ये या सुविधांच्या संख्येत वाढ केली आहे.

मुंबईत एप्रिल, मे आणि जून महिन्यात कोविड बाधित रुग्णांचा वाढलेला भर जूलैच्या महिन्यापासून काही प्रमाणात नियंत्रणात आला होता. मात्र हा भर नियंत्रणात आलेला असतानाच दुसरीकडे कोविड रुग्णालय आणि समर्पित आरोग्य केंद्रातील सुविधांमध्ये वाढ केली. त्यामुळे आरोग्य केंद्रातील वाढलेला ताण काही प्रमाणात कमी झाला होता. परंतु सप्टेंबर महिन्यात कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आल्या. त्यामुळे कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. परिणामी मागील दहा दिवसांमध्ये दररोज सरासरी दोन हजार रुग्ण आढळून येऊ लागले आहेत.

- Advertisement -

५ सप्टेंबर २०२० रोजी कोविड आरोग्य केंद्र आणि समर्पित कोविड काळजी केंद्राची संख्या १२ हजार ३१३ एवढी होती. ती संख्या दहा दिवसांत ५९२ ने वाढवण्यात आली. ही संख्या आता १२ हजार ९०५ एवढी झाली आहे. तर दहा दिवसांत आयसीयू बेडची क्षमता २१ ने वाढवण्यात आली आहे. पूर्वी ही क्षमता १३९७ एवढी होती, ती आता १४१८ एवढी करण्यात आली आहे. शिवाय व्हेंटिलेटरची क्षमता ३० ने वाढवली आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला ही क्षमता ९२९ एवढी होती, ती आता ९५९ एवढी करण्यात आली आहे. या बरोबरच ऑक्सिजन बेडची क्षमताही ४० ने वाढवत ७८७६ एवढी करण्यात आली. जी ४ सप्टेंबर रोजी ७८३६ एवढी होती.

सीसीसी-२ चे १४१ बेड वाढले

लक्षणे नसलेल्या आणि सौम्य स्वरूपाची लक्षणे असलेल्या बाधित रुग्णांसाठी ऑगस्ट अखेर पर्यंत २३ हजार ५३७ बेडची क्षमता होती. ती आता वाढवून २३ हजार ६७८ एवढी करण्यात आली आहे. त्यामुळे बेडची क्षमता १४१ वाढवण्यात आली आहे.

- Advertisement -

कोविड केंद्रातील आजची स्थिती (कंसात ४ सप्टेंबरची स्थिती)

कोविड रुग्णालय/ आरोग्य केंद्रातील बेड: १२ हजार ९०७५ (१२, ३१३)

सीसीसी- २ मधील बेड क्षमता: २३ हजार६७८ (२३,५३७)

आयसीयू बेड : १४१८ (१३९७)

व्हेंटिलेटर बेड: ९६९ (९२९)

ऑक्सिजन बेड: ७८७६ (७८३६)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -