घरताज्या घडामोडीभाजपने डावलल्यामुळे अपक्ष आमदार गीता जैन शिवसेनेत!

भाजपने डावलल्यामुळे अपक्ष आमदार गीता जैन शिवसेनेत!

Subscribe

भाजपला पाठिंबा दिल्यानंतरही नरेंद्र मेहता यांच्याकडे पक्षाची सूत्रे देऊन सतत डावलले जात असल्याने नाराज असलेल्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी अखेर आज शिवसेनेत प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मेहता यांचा पराभव करून निवडून आलेल्या जैन यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. मिरा भाईंदर भाजप आणि त्याचबरोबर महापालिकेची जबाबदारी पक्षाने आपल्याकडे द्यावी असा आग्रह जैन यांनी भाजपच्या प्रदेश नेतृत्वाकडे धरला होता. मात्र पक्षाने त्यांच्या या मागणीकडे साफ दुर्लक्ष केले होते.

गीता जैन अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्या असल्या तरी महापालिकेत त्या आजही भाजपच्या नगरसेविका म्हणून कार्यरत आहेत. परंतु, महापालिका कामकाज, महापालिका पदाधिकार्‍यांची निवड, स्थानिक पातळीवरील पक्ष पदाधिकार्‍यांच्या नेमणूका या सर्वांपासून जैन यांना नरेंद्र मेहता गटाने बाजूलाच ठेवले आणि पक्षाने देखील मेहता यांनाच साथ दिली. त्यामुळेच निराश झालेल्या जैन यांनी गेल्यावर्षी आपला भाजपशी संबंध नसून आपण अपक्ष आमदार म्हणूनच काम करणार असल्याचे जाहीर केले होते.

- Advertisement -

त्यातच फेबुवारी महिन्यात पार पडलेल्या महापौर निवडणुकीत जैन आणि त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी चक्क शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले होते. याचवेळी त्यांची शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशीही संपर्क निर्माण झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -