घरमनोरंजनपद्मश्री नृत्यकार आस्ताद देबू यांचे निधन

पद्मश्री नृत्यकार आस्ताद देबू यांचे निधन

Subscribe

आधुनिक आणि जुन्या काळातील भारतीय नृत्याची सांगड घालून त्यांनी नव्या पिढीसमोर एक वेगळी नृत्यकला सादर केली. त्यांच्या नृत्यातून त्यांनी रसिकमनावर अधिराज्य केले. तब्बल ५ दशके त्यांनी कलेची सेवा केली.

कथ्थक आणि कथकली हे दोन शास्त्रीय नृत्यप्रकार एकत्र करून आपली एक अनोखी नृत्यशैली बनवणारे पद्मश्री नृत्यकार आस्ताद देबू यांचे आज निधन झाले. मुंबईच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७३ वर्षांचे होते. त्यांची नृत्यातील कारकिर्द ही अविस्मरणीय आहे. आधुनिक आणि जुन्या काळातील भारतीय नृत्याची सांगड घालून त्यांनी नव्या पिढीसमोर एक वेगळी नृत्यकला सादर केली. त्यांच्या नृत्यातून त्यांनी रसिकमनावर अधिराज्य केले. तब्बल ५ दशके त्यांनी कलेची सेवा केली.

आस्ताद देबू यांच्या कुटुंबियांनी सोशल मीडियाच्या मार्फत त्यांच्या निधनाची बातमी दिली. मुंबईत त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. ‘आपल्या अविस्मरणीय नृत्यांच्या वारसा मागे सोडून त्यांनी जगाचा निरोप घेतला. आपल्या सुंदर नृत्यशैलीतून प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
मित्रमंडळी, देश-विदेशात शास्रीय आणि आधुनिक नृत्यातील सगळ्या कलाकारांना त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. त्यांची उणीव आम्हाला कायम जाणवेल’, असे त्यांच्या कुटुंबियांनी म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Astad deboo (@astaddeboo)

- Advertisement -

१३ जुलै १९४७ साली गुजरातच्या नवसारीमध्ये आस्तात देबू यांचा जन्म झाला. गुरू प्रल्हाद दास यांच्याकडून कथ्थक नृत्याचे शिक्षण घेतले. तर गुरू ई के पनिक्कर यांच्याकडून कथकली या शास्त्रीय नृत्याचे शिक्षण घेतले. कथ्थक आणि कथकली या दोन्ही नृत्यशैली एकत्र करून त्यांनी युवा पिढीला शास्त्रीय नृत्याकडे वळण्यास भाग पाडले. तब्बल ५ दशके कलेची सेवा करत त्यांनी एकूण ७० देशात आपली दमदार नृत्य सादरीकरणे केली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Astad deboo (@astaddeboo)

- Advertisement -


आस्ताब देबू यांनी बॉलिवूडमध्येही आपल्या कलेची छाप उमटवली. निर्माते मणिरत्न, विशाल भारद्वाज यांसारख्या दिग्गजांसोबत त्यांनी काम केले आहे. प्रसिद्ध चित्रकार एम एफ हुसैन यांच्या ‘मीनाक्षी: ए टेल ऑफ थ्री सिटीज’ या सिनेमासाठी नृत्य दिग्दर्शनही केले होते. १९९५ साली त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कराने सन्मानीत करण्यात आले होते. तर २००७ साली आस्ताद देबू यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.


हेही वाचा – रोहित शेट्टीच्या चित्रपटात पहिल्यांदाच झळकणार भाईजान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -