घरमुंबईचुंबन घेणे गुन्हा आहे का? रोखठोक भूमिका घेत ठाकरे गटाची शिंदे सरकारवर...

चुंबन घेणे गुन्हा आहे का? रोखठोक भूमिका घेत ठाकरे गटाची शिंदे सरकारवर टीका

Subscribe

मागील आठवड्यात शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार प्रकाश सुर्वे आणि महिला पदाधिकारी शीतल म्हात्रे यांच्यामधील प्रकरण खूप गाजले. यांवर सर्वाधिक टीका ही ठाकरे गटाकडून करण्यात आल्याने हे सर्व काही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनीच केले आहे, असे सांगत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. पण यावर आता ठाकरे गटाकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.

मागील आठवड्यात शिवसेनेच्या (शिंदे गट) शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला. यामध्ये शीतल म्हात्रे या प्रकाश सुर्वे यांचे चुंबन घेत असल्याचे दिसून येत आहे. पण हा व्हिडीओ ठाकरे गटाकडून मॉर्फ करून टाकण्यात आला आहे, असे शीतल म्हात्रे यांच्याकडून सांगण्यात आले. याबाबतची तक्रार देखील शीतल म्हात्रे यांनी पोलीस ठाण्यात केली. यानंतर पोलिसांकडून या प्रकरणात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची धरपकड करण्यास सुरूवात झाली. पण आता याबद्दल ठाकरे गटाकडून आक्रमक भूमिका घेत रोखठोक भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.

“महाराष्ट्रात एक जाहीर चुंबनाचे प्रकरण सध्या सगळ्यांचेच मनोरंजन करीत आहे. शिंदे गटाच्या एका आमदाराचे त्यांच्याच महिला पदाधिकाऱ्याने जाहीर चुंबन घेतले. त्या नाजूक चुंबनाचे राजकीय पडसाद उमटत आहेत. हे चुंबनाचे जिवंत दृश्य समाजमाध्यमांतून लगेच जगभर पोहोचले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत हे चुंबन प्रकरण घडले. आता या चुंबन प्रकरणात शिवसेनेच्या तरुण कार्यकर्त्यांच्या घरांवर धाडी घालून त्यांना अटक करण्यात आली आहे. सध्याच्या युगात प्रत्येक गोष्ट समाज माध्यमातून क्षणात पसरते व त्याचा दोष तुम्ही कुणाला देणार? मुळात चुंबन घेणे हा गुन्हा आहे काय यावर निर्णय व्हायला हवा,” असे ठाकरे गटाकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

तर, चुंबन हा गुन्हा नसेल तर मग शिवसैनिकांना अटक करण्याचे कारण काय? संबंधित आमदार व महिला कार्यकर्त्यास चुंबन प्रकरणाचा मनस्ताप झाला हे मान्य केले तरी, सार्वजनिक ठिकाणी घेतलेले साधे चुंबन हे अश्लील कृत्यात मोडते काय याचा खुलासा व्हावा व अटक केलेल्या शिवसैनिकांची सुटका व्हावी. महाराष्ट्रातील सरकारला चुंबनाचे वावडे कधीपासून झाले? श्री. एकनाथ शिंदे व त्यांच्या लोकांनी फडणवीस यांच्याबरोबर सरळ ‘लव्ह जिहाद’चाच प्रकार केला व उघडपणे अनैतिक पद्धतीने एकत्र राहत आहेत, यास काय म्हणावे!, असे प्रश्न उपस्थित करत ठाकरे गटाने आपली भूमिका स्पष्ट करत शिंदे गटाला पुन्हा एकदा टोला लगावला आहे.

दरम्यान, या प्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांनी पाच दिवसानंतर समाज माध्यमांना पत्र लिहीत आपली भूमिका स्पष्ट केली होती. या सर्व प्रकरणामुळे मला आणि माझ्या परिवाराला मनस्ताप झाला आहे. सौ. शीतल म्हात्रे या मला माझ्या बहिणीसारख्या असल्याचे सुर्वे यांनी पत्राच्या माध्यमातून सांगतले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राहुल गांधींच्या अडचणी वाढल्या? नोटीसला उत्तर न दिल्याने दिल्ली पोलीस घरी धडकले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -