घरपालघरक्षितिज ठाकूरांचे मत गुलदस्त्यात परदेशवारीमुळे उमेदवारांचे टेन्शन वाढले

क्षितिज ठाकूरांचे मत गुलदस्त्यात परदेशवारीमुळे उमेदवारांचे टेन्शन वाढले

Subscribe

विधान परिषदेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीची ३ मते निर्णायक ठरत असतानाच आमदार क्षितिज ठाकूर यांच्या परदेशवारीने काठावर असलेल्या पक्षांच्या मनात धडकी भरली आहे. ठाकूर कधी परतणाऱ हे अद्याप गुलदस्त्यातच असल्याने त्यांची धाकधूक अधिकच वाढली आहे. विधान परिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे १०व्या जागेसाठी मोठी चुरस असणार आहे. यामध्ये बहुजन विकास आघाडीची ३ मते महत्त्वाची ठरणार आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षातील उमेदवार आवर्जून बविआचे प्रमुख आमदार क्षितिज ठाकूर यांची भेट घेत आहेत. रविवारी राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे यांनीही आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली.

आमदार क्षितिज ठाकूर गेल्या आठवड्यात न्यूयॉर्कला रवाना झाले होते. आमदार ठाकूर कधी परतणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही, मात्र आमदार हितेंद्र ठाकूर यांनी क्षितिज ठाकूर कौटुंबिक कामासाठी अमेरिकेला गेले आहेत. त्यांच्या एका मतापेक्षा कौटुंबिक जबाबदार्‍याही महत्त्वाच्या असतात. एक मत पडले किंवा नाही पडले तर काय फरक पडतो, असे म्हणत त्यांनी उत्सुकता वाढवली.

- Advertisement -

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपसाठी एकेक मत महत्त्वाचे आहे. त्यामुळे आमदार क्षितिज ठाकूर सोमवारी मतदानासाठी येणार की नाही याची वाट पाहिली जात आहे. तसेच दररोज दिग्गज नेते विरारमध्ये हजेरी लावून ३ मतांचा जोगवा मागताना दिसत आहेत. याआधी भाजपचे उमेदवार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, काँग्रेसचे रामराजे नाईक-निंबाळकर, भाई जगताप यांनीही ठाकूर यांची भेट घेतली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -