घरमुंबई२६ जुलैमध्ये वाचली; पण १७ जुलैमध्ये सापडली

२६ जुलैमध्ये वाचली; पण १७ जुलैमध्ये सापडली

Subscribe

१६ वर्षांपूर्वी झालेल्या ढगफुटीत उर्मिलाच्या घराची दैना झाली आणि आता जुलैमधील पावसाने तिच्यासह घरातील दोनजणांचे प्राण घेतले.

२६ जुलै २००५ रोजी झालेल्या ढगफुटीवेळी संपूर्ण घरदार वाहून गेले… यात उर्मिला ठाकूरला किरकोळ दुखापत झाली… मात्र शनिवारी १७ जुलैला झालेल्या पावसात काळाने तिच्यावर झडप घातली. १६ वर्षांपूर्वी झालेल्या ढगफुटीत उर्मिलाच्या घराची दैना झाली आणि आता जुलैमधील पावसाने तिच्यासह घरातील दोनजणांचे प्राण घेतले.

चेंबूर येथे कोसळलेल्या दरडीमध्ये उर्मिला ठाकूर हिच्यासह (३२) तिची दोन वर्षांची मुलगी खुशी ठाकूर आणि आई जीजाबाई तिवारी (५४) यांचा शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे कोसळलेल्या दरडीमुळे मृत्यू झाला. तर तिचा भाऊ लल्लन तिवारी आणि त्याची पत्नी अनुजा तिवारी हे दोघे बचावले आहेत. पण पावसाने तिवारी कुटुंबाच्या मनात धडकी भरवली आहे. कारण २६ जुलैला झालेल्या पावसामध्ये या कुटुंबाचे संपूर्ण घर वाहून गेले होते. त्यावेळी उर्मिला ठाकूरला किरकोळ दुखापत झाली होती. मात्र घटनेतून ती बर्‍याच महिन्यांनंतर सावरली. मात्र तब्बल १६ वर्षांनंतर म्हणजेच १७ जुलैच्या रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे कोसळेल्या दरडीमध्ये उर्मिला ठाकूरवर काळाने झडप घातली. मात्र यावेळी तिच्यासोबत तिची मुलगी आणि आई यांनाही त्याने आपल्यासोबत नेले. जुलैच्या पावसात एकदा घर गमावले तर एकदा घरातील सदस्यांना गमावल्याचे उर्मिलाचा भाऊ लल्लन तिवारी डबडबलेल्या डोळ्यांनी सांगत होता. हातावर पोट असलेले तिवारी कुटुंब मागील अनेक वर्षांपासून चेंबूर येथे एकत्रित राहत आहे. लल्लन तिवारी हे टॅक्सी चालक आहेत. रविवारी मध्यरात्री दरड कोसळली त्यावेळी लल्लन तिवारी व त्यांची पत्नी अनुजा हे दोघे घरी नव्हते. काही कामानिमित्त लल्लन हे बाहेर होते तर त्यांची पत्नी माहेरी गेली होती. या घटनेमुळे तिवारी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -