घरताज्या घडामोडीकल्याण पोलिसांनी चिमुकलीला दिलं सरप्राईज : केला वाढदिवस साजरा

कल्याण पोलिसांनी चिमुकलीला दिलं सरप्राईज : केला वाढदिवस साजरा

Subscribe

दिवस रात्र जनतेसाठी राबणाऱ्या पोलिसांनी एका २ वर्षाच्या चिमुरडीचा वाढदिवस साजरा करत तिला सरप्राईज दिले आहे.

दिवस रात्र जनतेसाठी राबणाऱ्या पोलिसांच्या भावनिक पैलूंचे दर्शन अनेकवेळा समोर आले आहे. असाच एक प्रसंग बुधवारी कल्याणकरांनी अनुभवला आहे. एका देान वर्षाच्या चिमुकलीला केक आणि बिस्कीट देऊन कल्याण पोलिसांनी तिचा वाढदिवसा साजरा केला. पोलिसांकडून सरप्राईज मिळाल्याने सर्वांनाच सुखद धक्का बसला आहे. कल्याणातील कोळसेवाडी परिसरात हा प्रसंग घडला आहे.

असा साजरा केला वाढदिवस

लॉकडाऊनच्या काळात सर्वत्रच संचारबंदी लागू आहे. त्यामुळे कल्याण पूर्वेतील चिंचपाडा रोड जय आंबे इमारतीत राहणारे जयेश सावंत यांच्या भाचीचा वाढदिवस कसा साजरा करायचा असा प्रश्न पडला होता. जयेश यांची बहिण आणि तिचा पती हे कुटूंबासह पुण्याला राहतात. भाची अधिरा ही लहानपणापासून मामाकडेच राहते. लॉकडाऊनमुळे आई वडिलही अधिराच्या वाढदिवसाला येऊ शकत नव्हते आणि कल्याणात लॉकडाऊन कडक असल्याने दुकानेही बंद आहेत. त्यामुळे जयेश यांनी ठाणे पोलीस आयुकतांना ट्विट करून अधिराला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात अशी विनंती केली होती. मात्र, या भावनिक ट्विटची दखल तात्काळ पोलीस आयुक्तांनी घेतली.

- Advertisement -

त्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहू राजे साळवे यांना चिमुकलीचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासंदर्भात सांगितले. साळवे यांनीही तत्काळ सावंत यांच्याशी संपर्क साधत त्याच्या घरी जाऊन चिमुकल्या अधिराला केक, बिस्किटे देऊन तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पोलिसांकडून मिळालेल्या सरप्राईजने तिचे मामा आणि कुटुंबिय भारावून गेले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराजे साळवे म्हणाले की, ‘नागरिक आम्हाला सहकार्य करीत आहेत, त्यामुळे आम्हीही जनतेच्या प्रत्येक भावनांशी जुळवून घेत आहोत. अधिराच्या मामाची अधिराला आम्ही किमान शुभेच्छा तरी द्याव्यात अशी इच्छा होती’, ठाणे पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार आम्ही अधिराला केक आणि बिस्किटे देत आमचे कर्तव्य पार पाडले.


हेही वाचा – चाकरमान्यांनो बॅगा भरा, चार दिवसांत निर्णय होणार – भास्कर जाधव


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -