घरमनोरंजनKapil Dev love story-कपिल देव 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात झाले होते क्लिन बोल्ड

Kapil Dev love story-कपिल देव ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात झाले होते क्लिन बोल्ड

Subscribe

बॉलीवूडस्टार रणवीर सिंग याच्या ‘ ८३’ या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रसि्दध झाला आहे. यात त्याने भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. यामुळे पुन्हा एकदा सोशल मिडियावर कपिल देव यांच्या खासगी आयुष्यातील गोष्टींवर चर्चाही सुरू झाली आहे. यात कपिल देव आणि त्यांची पत्नी रोमी भाटीया यांच्या लव्हस्टोरी बरोबरच अजून एका अभिनेत्रीची चर्चा आहे.ती अभिनेत्री आहे सारिका. सारिका ही एकेकाळची सुप्रसिद्ध अभिनेत्री असून कमल हसन यांची पूर्वपत्नी आहे.

- Advertisement -

सारिकाच्या आधी कपिल देव आणि सध्या त्यांची पत्नी असलेली रोमी भाटीया यांच्यात प्रेमसंबंध होते. पण काही कारणास्तव त्यांचा ब्रेकअप झाला होता.

याचदरम्यान, कपिल देव आणि सारिका यांची पहीली भेट एका पार्टीत झाली. ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या पत्नीने आयोजित केलेल्या या पार्टीत या दोघांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी पहील्याच नजरेत कपिल देव सारिकाच्या प्रेमात पडले.

- Advertisement -

त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. भेटीगाठी वाढू लागल्या. सारिकाबाबतीत कपिल देव पझेसिव्ह होते. तिचे रात्री उशीरापर्यंत पार्टयांमध्ये जाणे त्यांना आवडत नव्हते.

त्यावरून त्यांच्यात खटके उडू लागले. सारिकाने याबद्दल कपिल देव यांना वारंवार समजावण्याचा व ती अभिनेत्री असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. पण कपिल देव यांनी एका क्षणी सारिकाला बॉलीवूड सोडण्यास सांगितले. जे सारिकाला शक्य नव्हते. सारिकाने बॉलीवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली होती. यामुळे तिने बॉलीवूड सोडण्यास नकार दिला. नंतर हे दोघे कायमचे वेगळे झाले.

त्यानंतर कपिल देव पुन्हा रोमी भाटीयाकडे केले.  त्यांनी रोमी भाटीयाबरोबर लग्न केले. आज या दामप्त्याला एक मुलगी आहे.

तर सारिकानेही कमल हसन यांच्याबरोबर संसार थाटला.

त्यांना अक्षरा आणि श्रुती या दोन मुली असून दोघीही बॉलीवूड आणि टॉलीवूडमध्ये अभिनेत्री आहेत.

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -