घरदेश-विदेशजम्मू- काश्मीरमधील काश्मिरी पंडितांची जिल्हा मुख्यालयात बदली, मुख्य शिक्षण अधिकाऱ्यांचा निर्णय

जम्मू- काश्मीरमधील काश्मिरी पंडितांची जिल्हा मुख्यालयात बदली, मुख्य शिक्षण अधिकाऱ्यांचा निर्णय

Subscribe

जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांना (Kashmiri Pandits) दहशतवाद्यांकडून सातत्याने लक्ष्य करण्यात येत आहे. त्यामुळे काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेसाठी स्थानिक प्रशासनाने एक महत्ताचा निर्णय घेतला आहे. याअतंर्गत श्रीनगरमधील विविध भागात तैनात असलेल्या काश्मिरी पंडितांची जिल्हा मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. याबाब श्रीनगर मुख्य शिक्षण अधिकाऱ्यांनी पत्रक काढले आहे.

सुरक्षा देण्यासाठी प्रशासनाने उचलली पावले –

- Advertisement -

दोनच दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी बँकमध्ये घुसून एका तरुणाची हत्या केली. त्याआधी कुलगाममध्ये एका शिक्षिकेची हत्या करण्यात आली. विद्यार्थ्यांसमोरच दहशतवाद्यांनी शिक्षिकेवर गोळ्या झाडल्या होत्या. अशा प्रकारचे जीवघेणे हल्ले काश्मीर खोऱ्यातील पंडितांवर दहशतवाद्यांकडून होत आहेत. महिन्याभरात हल्ल्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे काश्मिरी पंडितांच्या हत्येने खोऱ्यात संतापाचे वातावरण आहे. या प्रकारांमुळे काश्मिरी पंडितांना सुरक्षा देण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत.

काश्मिरी पंडित बदलीसाठी रस्त्यावर –

- Advertisement -

काश्मिरी पंडितांच्या हत्या होत असल्याने खोऱ्यात दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे जम्मू शहरात तत्काळ बदली व्हावी यासाठी गुरुवारी शेकडो सरकारी कर्मचारी रस्त्यावर उतरले होते. सरकारने आम्हाला सुरक्षित वातावरण द्यावे अशी मागणी त्यांनी केली होती. यावेळी जोपर्यंत सुरक्षेसाठी सुरक्षेसाठी पावलं उचलली जात नाहीत, तोपर्यंत काम करणार नसल्याचा इशार कर्मचाऱ्यांनी दिली होता.

आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांची बैठक –

काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. या बैठकीत जम्मू- काश्मीरचे (Jammu and Kashmir) उपराज्यपाल मनोज सिन्हा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह, केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला, केंद्रीय राखीव पोलीस दराचे महासंचालक कुलदीप सिंह आणि सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख पंकज सिंह उपस्थित होते.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -