राणा दामत्याविरुद्ध 85 पानांचे आरोपपत्र दाखल, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा

अमरावतीचे अपक्ष खासदार नवनीत रवी राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालीसा पठणाची (Hanuman Chalisa) घोषण केली होती. या घोषणेने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने राणा दामत्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजाविण्यात आली होती.

bmc will investigate illegal construction in the khar building where rana and his wife
Navneet Ravi Rana Residence : राणा दाम्पत्याच्या राहत्या इमारतीची महापालिकेकडून अडीच तास झाडाझडती

कारवाईसाठी गेलेल्या खार पोलिसांशी (Khar police) हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा (Crime for obstructing government work) दाखल झालेल्या खासदार नवनीत रवी राणा (MP Navneet Ravi Rana) आणि त्यांचे आमदार पती रवी राणा (Ravi Rana) यांच्याविरोधात बुधवारी खार पोलिसांनी बोरिवलीतील लोकल कोर्टात 85 पानांचे आरोपपत्र (chargesheet)  दाखल केले. त्यात 23 साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले असून येत्या गुरुवारी 16 जूनला नवनीत राणा आणि रवी राणा यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. राणा दामत्य कोर्टात गैरहजर राहिल्याने आरोपपत्राची प्रत त्यांच्या वकिलांना देण्यात आली होती.

अमरावतीचे अपक्ष खासदार नवनीत रवी राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालीसा पठणाची (Hanuman Chalisa) घोषण केली होती. या घोषणेने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने राणा दामत्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजाविण्यात आली होती. ही नोटीस देऊनही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हनुमान चालीसा पठण करणारच अशी घोषणा केली होती. त्यामुळे त्यांच्या खार येथील राहत्या घरी खार पोलिसांचे एक विशेष कारवाईसाठी गेले होते. यावेळी त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा व्हिडीओ नंतर सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. या घटनेनंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरुद्ध खार पोलिसांनी पोलिसांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता.

या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्याने खार पोलिसांनी बुधवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात या दोघांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. 85 पानांच्या या आरोपपत्रात 23 जणांची जबानी नोंदविण्यात आली आहे. त्यात सोशल मिडीयावर व्हायरल झालेले व्हिडीओचा समावेश आहे. आरोपपत्र दाखल होणार असल्याची माहिती राणा दामत्यांना देण्यात आली होती. मात्र ते कोर्टात गैरहजर राहिले होते. त्यामुळे त्यांच्या वतीने त्यांच्या वकिलांना आरोपपत्राची प्रत देण्यात आली आहे. आता येत्या गुरुवारी 16 जूनला या दोघांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.