घरमुंबईढेकणं चिरडायला तोफेची गरज नसते - उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

ढेकणं चिरडायला तोफेची गरज नसते – उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबाद मध्ये सभा होत आहे. या वेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला असून ढेकणं चिरडायला तोफेची गरज नसते, असे सांगत ठाकरे यांनी भाजपच्या सर्वच नेत्यांवर निशाना साधला आहे. यावेळी ठाकरे यांनी भाजपच्या हिंदुत्व वादावर ही आसूड ओढले.

हिंदूत्व भगव्या टोपीत असेल तर संघ काळी टोपी का घालतो? भाजप जर ऐकत नसेल तर संघाने त्यांच्या कानाखाली मारले पाहीजे या शब्दात ठाकरे यांनी संघावरही टीका केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप संदर्भातील सर्वच मुद्द्यावर आपले प्रखर मत मांडले. भाजपने आपल्या प्रवक्त्यांच्या डोक्यात मेंदू असेल तर त्यांना काही गोष्टी शिकवाव्यात, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

- Advertisement -

औरंगाबाद शहराचे नामांतर –

तसेच औरंगाबाद शहराचे नाव बदलण्यावर ही त्यांनी भाष्य केले. मी आत्ताही शहराचे नाव बदलू शकतो. मात्र, नाव बदलले आणि पाणी प्रश्न तसाच राहील्यास संभाजी महाराज मला टकमक टोकावर नेतील, असे ही ते यावेळी म्हणाले. माझ्याकडे प्रामाणिकपणा असून वेळेत पाणी योजना पूर्ण झाली नाही तर ठेकेदारांना तुरूंगात टाकण्याचा इशारा ही यावेळी त्यांनी दिला. यावेळी इथल्या विमानतळाला आम्ही छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नाव देण्याचा प्रस्ताव पारित केला आणि तो केंद्राकडे पाठवला. पण केंद्राने तो अडवून ठेवला, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे.

- Advertisement -

काश्मिरी पंडितांनी पुन्हा घरं सोडली –

काश्मिरी पंडितांनी पुन्हा घरं सोडली आहे. घरात, शाळेत जाऊन गोळ्या घातल्या जात आहेत. हिंमत असेल तर काश्मिरमध्ये जाऊन हनुमान चालिसा वाचा… मर्द असाल तर पहिले काश्मिरी पंडितांची सुरक्षा करा. असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे आणि भाजपाला दिले आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपाने काय केले, असा सवाल त्यांनी केला आहे. एकदा शिवसेना आणि भाजपाने हिंदुत्वाने काय केले, याचे एकदा समोरासमोर करुच, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शिवसेनाप्रमुखांनी मुसलमानांचा मुसलमान द्वेष करा असे कधीही सांगितले नाही. शिवाजी महाराजांनीही अन्य धर्माचा आदर केला आहे. बाळासाहेबांनीही हा देश हाच माझा धर्म म्हणून बाहेर पडण्यास सांगितले. असेही उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले.

मशिद पाडली तेव्हा शिवसैनिक नव्हतेस मग… –

रुपया खाली घसरतोय, पण आम्हाला चिंता कोणती तर कोणत्या मशिदीखाली शिवलिंग आहे. आमचं हिंदुत्व मोजण्याची मोजपट्टी तुम्हाला कुणी दिली? चला होऊन जाऊद्या… शिवसेनेनं हिंदुत्वासाठी काय केलं आणि भाजपने काय केले हे एकदा खुल्या मंचावर होऊन जाऊ द्या. आता फडणवीस सांगत आहेत बाबरी मशिद पाडली तेव्हा शिवसैनिक नव्हते. मग मला सांगा संभाजीनगरचे मोरेश्वर सावे तिकडे गेले नव्हते का, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी भाजपाला केला आहे. अमरनाथ यात्रेवर गंडांतर आले, काश्मिरी पंडितांच्या मागे शिवसेनाप्रमुख उभे राहिले नसते तर दिल्लीच्या तख्तावर आज तुम्ही हिंदुत्वाच्या जोरावर बसले असता काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.

 

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -