घरमुंबईरक्तगट जुळत नसताना केले किडनी प्रत्यारोपण

रक्तगट जुळत नसताना केले किडनी प्रत्यारोपण

Subscribe

भावाचे आणि बहिणीचे रक्तगट जुळत नव्हते तरी देखील हे किडनी प्रत्यारोपण ग्लोबल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी यशस्वीरित्या पार पाडले आहे.

मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमधील डॉक्टरांना रक्तगट जुळत नसताना किडनी प्रत्यारोपण करण्यात यश आलं आहे. ग्लोबल हॉस्पिटलचे इन्स्टिट्यूट ऑफ रेनल सायन्सेसचे संचालक डॉ. भरत शाह यांच्या नेतृत्वाखालील टीमने ६१ वर्षीय किरण पांडे यांच्यावर ब्लड ग्रुप इन्कम्पॅटिबल (रक्तगट जुळत नसताना) मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली. या रुग्णावर २००५ साली पहिली किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. त्यावेळी, त्यांच्या पत्नीने मूत्रपिंड दान केले होते. त्यांचे मूत्रपिंड आतापर्यंत व्यवस्थित कार्य करत होते. पण, ते आता निकामी झाले. त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं. त्यानुसार, बहिणीने किडनी दान करण्याचा निर्णय घेत भावाला जीवदान दिलं आहे.

याविषयी ग्लोबल हॉस्पिटलचे इन्स्टिट्यूट ऑफ रेनल सायन्सेसचे संचालक डॉ. भरत शाह यांनी सांगितलं की, “किरण जेव्हा पहिल्यांदा तपासणीसाठी आले तेव्हा त्यांना खूप काळ जुलाबाचा त्रास होत होता असं कळलं आणि प्रत्यारोपण केलेल्या मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित होत नव्हते. ते घेत असलेले एक विशिष्ट औषध या जुलाबासाठी कारणीभूत होते, असे निदान झाले. त्याच्यावर औषधोपचार करुन जुलाबाची समस्या थांबली. पण प्रत्यारोपित मूत्रपिंडाचे कार्य दिवसेंदिवस कमी होत गेले आणि त्यांना अजून एका प्रत्यारोपणाची आवश्यकता भासली.”

- Advertisement -

‘ब्लड ग्रुप इनकम्पॅटिबल’ प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

रुग्णाच्या दोन बहिणी पुढे आल्या आणि त्यांनी रुग्णाला मूत्रपिंड दान करण्याची इच्छा दर्शवली. पण “त्यांच्या दोन्ही बहिणींचे रक्तगट वेगळे होते. त्यांच्या तपासण्या केल्या आणि ज्या बहिणीची उती रुग्णाशी १०० टक्के जुळत होती. त्या बहिणीची निवड करण्यात आली. किरण यांचा रक्तगट ओ पॉझिटीव्ह होता तर, त्यांच्या बहिणीचा (श्रद्धा आवळेगावकर) यांचा रक्तगट एबी पॉझिटीव्ह प्लस होता. तरीही, डॉक्टरांनी जुळत नसलेल्या रक्तगटांसोबत किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली. १४ ऑगस्टला या रुग्णावर ‘ब्लड ग्रुप इनकम्पॅटिबल’ प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ”

किडनी दान केलेल्या श्रद्धा आवळेगावकर म्हणाल्या, “मी माझ्या भावाच्या वेदना पाहिल्या आहेत आणि त्याचे आयुष्य वाचवण्यासाठी मी काहीही केले असते.”

- Advertisement -

लोकांनी अवयवदान करावे

‘अनेक प्रकारचे उपचार करूनही माझी प्रकृती ढासळतच होती. मी आशा सोडली होती. पण, माझ्या कुटुंबियांनी मला आधार दिला. माझ्या बहिणीने जसे माझ्यासाठी मूत्रपिंड दान केले, तसे लोकांनी अवयवदान करावे, अशी प्रतिक्रिया किरण यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -