घरमुंबईकिर्ती व्यासच्या हत्येतील आरोपींना ३१ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी

किर्ती व्यासच्या हत्येतील आरोपींना ३१ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी

Subscribe

किर्ती व्यास हत्याप्रकरणी न्यायालयाने किर्तीचे सहकारी आणि आरोपी सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी सेजवाणी या दोघांना ३१ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या हत्येचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. परंतु किर्तीचा मृतदेह अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिसांनी किर्तीचे सहकारी सिद्धेश आणि खुशीला यापूर्वीच अटक केली होती. या दोघांची पोलीस कोठडी गुरूवारी संपली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांच्या शिक्षेत वाढ करत त्यांची रवानगी न्यायालयीत कोठडीत केली आहे.

किर्ती मृत्यूपुर्वी खुशी आणि सिद्धेशसोबत त्यांच्या गाडीत पहायला मिळाली होती. पुढे तिचे काय झाले? याबाबत कोणालाच माहीत नाही. पोलीस तपासात खुशीच्या गाडीत किर्तीचे रक्त आढळून आले होते. शिवाय पोलिसांच्या हाती काही तांत्रिक पुरावे लागले आहेत.

- Advertisement -

सिद्धेश आणि खुशी दोघांच्या चौकशीतून त्यांनी तिची हत्या करून तिला माहूल खाडीत टाकल्याचे समजले. परंतु किर्तीची हत्या केलीच नसल्याचा दावा ते दोघे करत आहेत. अटकेनंतर कोर्टाने दोघांना १५ मे पर्यंत पोलीत कोठडी सुनावली होती. गुरूवारी त्यांची पोलिस कोठडी संपल्यानंतर कोर्टाने दोघांना ३१ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान पोलिसांनी जबरदस्तीने दोघांकडून हत्या कबूल करवून घेतली असल्याचा दावा त्यांच्या पालकांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -