घरमुंबईओवळे गावात बिबट्याचा प्राणघातक हल्ला

ओवळे गावात बिबट्याचा प्राणघातक हल्ला

Subscribe

व्यावसायिक किरकोळ जखमी, ग्रामस्थांमध्ये घबराट

तालुक्यातील ओवळे गावातील एका व्यावसायिकावर बिबट्याने हल्ला केला, मात्र, नशीब बलवत्तर म्हणून हल्ल्यात अडकलेला व्यक्ती किरकोळ जखमी झाला आणि पुढील अनर्थ टळला. यावेळी प्रत्यक्षदर्शींनी पनवेल शहर पोलीस ठाण्यासह उरण वनविभाग आणि पनवेल वनविभाग येथे संपर्क साधल्यानंतर जागेचा पंचनामा करण्यात आला. मात्र, याठिकाणी बिबट्याचे कोणत्याही प्रकारचे ठसे न आढळल्याने वनविभागाचे अधिकारीही चक्रावून गेले आहेत.

तालुक्यातील ओवळे गावात बिबट्याने ७ ऑक्टोबर रोजी ओवळे गावातील धर्मा म्हात्रे हे गावदेवी मंदिराच्या मागे चालण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात ते जखमी झाले. यावेळी आजूबाजूला असलेल्या कामगारांनी आरडाओरड केल्यामुळे बिबट्याने तिथून पळ काढला व तो डोंगराच्या दिशेने पळून गेला. मात्र बिबट्याच्या या हल्ल्यामुळे ओवळे येथील ग्रामस्थ बिबट्याच्या दहशतीत वावरत आहेत. लहान मुलांना घराबाहेर सोडण्यासाठीही पालक घाबरत आहेत.

- Advertisement -

विमानतळाचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात येथील परिसरात कामगारांची ये-जा सुरू आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे रात्रपाळीला येणार्‍या कामगारांमध्ये अधिक भीती आहे. या घटनेनंतर ओवळेगावात बिबट्याला पकडण्यासाठी वन अधिकारी आणि पोलीस दाखल झाले आहेत, यावेळी ज्या ठिकाणी हल्ला झाला त्याठिकाणी बिबट्याचे ठसे न आढळल्याने किरकोळ जखमी झालेले धर्माशेठ नारायण म्हात्रे यांना झालेली दुखापत नेमकी कशामुळे झाली याचा शोध वनविभागाचे अधिकारी करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -