घरमुंबईसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची दहशत

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची दहशत

Subscribe

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दोन दिवस बिबट्या आढळल्याने संपूर्ण परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. मात्र हा बिबट्या नरभक्षक असल्यास हल्ला करु शकतो. त्यामुळे हे टाळण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जात आहे.

मुंबईतल्या प्रमुख आकर्षणांपैकी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे एक आहे. या उद्यानात पर्यटकांना विविध प्राणी आणि पक्षी पाहण्याचे आकर्षण असते. या उद्यानात मोठ्या प्रमाणात मुंबईसह इतर भागातून देखील पर्यटक येत असतात. भल्याभल्यांना वाघोबाला पाहण्याची उत्सुकता असते. मात्र आता नॅशनल पार्कमध्ये सफर करताना जरा जपून करावी लागणार आहे. कारण सध्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळत आहे. यामुळे येथील परिसरामध्ये घबराट पसरली असून खळबळजनक वातावरण पसरले आहे. त्यामुले या परिसरातील बिबट्यांच्या वावरावर नियंत्रण आणण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना केली आहे.

या ठिकाणी दिसला बिबट्या

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या शेजारी असलेल्या इमारतीच्या संरक्षक भिंतीवर बिबट्या बसल्याचे तेथील रहिवाशांनी पाहिले. हा बिबट्या दोन दिवस त्या ठिकाणी बसला होता. रविवारी रात्री ११.३० वाजता तर बुधवारी १२.३० वाजण्याच्या सुमारास म्हाडा कॉलनीच्या न्यू दिंडोशी गिरीकुंज गृह संस्थेच्या संरक्षक भिंतीवर बिबट्या बसल्याचे तेथील रहिवाशांनी पाहिले. ते पाहून तेथील नागरिकांची एकच घाबरगुंडी उडाली. दोन दिवस मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण पसरले होते. या उद्यानात रात्री लहान मुले तसेच इतर नागरिक शतपावली करत असतात. मात्र हा बिबट्या कोणत्याही क्षणी हल्ला करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच मनुष्य वस्तीत वावरणारा हा बिबट्या नरभक्षक देखील असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे टाळण्यासाठी आणि वाघांच्या संचारावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात. असे आदेश तात्काळ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संबंधित अधिकाऱ्यांना द्याव्यात अशी मागणी शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी केली आहे.

- Advertisement -

वाचा – अबब ! ‘त्याच्या’ बिछान्यात चक्क बिबट्या होता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -