Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई पंतप्रधान मोदींच्या डिग्रीप्रमाणे फडणवीस यांच्या वकिलीच्या डिग्रीवरही...; शिवसेनेचा 'सामना'तून टोला

पंतप्रधान मोदींच्या डिग्रीप्रमाणे फडणवीस यांच्या वकिलीच्या डिग्रीवरही…; शिवसेनेचा ‘सामना’तून टोला

Subscribe

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिली आहे, परंतु या निकालानंतर आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. याचवेळी ‘सामना’च्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हटली की, पंतप्रधान मोदींच्या डिग्रीप्रमाणे (PM Narendra Modi Degree) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या वकिलीच्या डिग्रीवरही लोक उद्या संशय घ्यायला लागतील.

सत्तासंघर्षावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेतून फुटलेले 16 आमदार पात्र की अपात्र याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर घ्यावा, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे केव्हा यावरचा निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार एकनाथ शिंदे यांनी पक्षावर केलेला दावा हाच एका अर्थाने प्रतोद, एकनाथ शिंदे यांच्या गटनेते पदाला आव्हान, व्हिप जारी करण्याचा आदेश हा मूळ पक्षाच्या प्रतोदाला आहे असाही त्यांनी निर्णय दिला आहे. याशिवाय 16 आमदार पात्र की अपात्र याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर घ्यावा, असे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

शिंदे गटातील 16 आमदारांवर कायदे पंडित असलेले विधानसभा अध्यक्ष कायद्याची व संविधानाची हत्या करून सरकारला वाचवणार का? असा प्रश्न सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस वकील आहेत. ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने राजकीय सोयीचा अर्थ निकालातून काढत आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या डिग्रीप्रमाणे फडणवीस यांच्या वकिलीच्या डिग्रीवरही लोक उद्या संशय घ्यायला लागतील, असा टोलाही लगावला आहे. राज्यपालांनी बहुमत चाचणीचा दिलेला निर्णय न्यायालयाने गैर ठरवला असला तरीही त्यातून निर्माण होणारे सरकार लबाडी करून सत्तेवर बसणरा असेल तर या लबाडीची वकीली देंवेंद्र फडणवीस करणार आहेत. कारण ते राज्याचे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय मंत्री आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने काहीही निकाल दिली तरी ते त्याच्या पद्धतीने त्या निकालाचा अर्थ काढणार आणि खुर्च्यांना चिकटून बसणार, असा हल्लाबोलही सामनाच्या अग्रलेखातून फडणवीस यांच्यावर करण्यात आला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -