घरमहाराष्ट्र16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय तातडीने घ्यावा, शिवसेना ठाकरे गट अध्यक्षांना पत्र लिहिणार

16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय तातडीने घ्यावा, शिवसेना ठाकरे गट अध्यक्षांना पत्र लिहिणार

Subscribe

कोर्टाने निर्णय दिला आहे की १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा रिजनेबल वेळेत अध्यक्षांनी घ्यावा. त्यासाठी आम्ही अध्यक्षांना पत्र लिहून तातडीने निर्णय घेण्याची मागणी करणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

कोर्टाने निर्णय दिला आहे की १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा रिजनेबल वेळेत अध्यक्षांनी घ्यावा. त्यासाठी आम्ही अध्यक्षांना पत्र लिहून तातडीने निर्णय घेण्याची मागणी करणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. (disqualification of 16 MLAs should be decided immediately, Thackeray group write letter to Assembly Speaker) तर अध्यक्षांनी याबाबत योग्य तो कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घ्यावा, अन्यथा त्यांच्या या निर्णविरोधात आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) जाऊ असे ठाकरे गटाकडून सांगण्यात आले आहे. कोर्टाने दिलेल्या निर्णयाबाबत बोलण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मातोश्री येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी कोर्टाने दिलेल्या निर्णयाबाबत भाष्य केले.

हेही वाचा – कोर्टाच्या निकालानंतर शरद पवार यांचे ‘ते’ ट्वीट्स चर्चेत, काय होती भूमिका

- Advertisement -

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, विधासभा अध्यक्षांनी 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अध्यक्षांनी जर काही वेडावाकडा निर्णय घेतला तर आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आम्हाला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आधी आमच्यात होते. मग राष्ट्रवादीत गेले मग ते भाजपमध्ये गेले. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून पक्षांतर कसं करायचं ते राहुल नार्वेकरांना माहित आहे, असे म्हणत त्यांनी अध्यक्षांवर टीका केली. तर सध्या अस्तित्वात असलेलं सरकार हे बेकायदेशीर आहे. मी नैतिकतेला धरुन राजीनामा दिला आहे. मी माझ्या निर्णयावर समाधानी असल्याचे उद्धव ठाकरे यांच्याकडून पुन्हा सांगण्यात आले आहे.

निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे…
सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा निर्णय दिला आहे. त्यामुळे सर्वांनी आता निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयानंतर जनतेचे न्यायालय हे मोठे न्यायालय आहे. आपण जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि त्यांच्यावर निर्णय सोपवू. जनता देईल तो कौल स्वीकारु असेही यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

बेकायदेशीर सरकारने राजीनामा द्यावा
मेलेला पोपट हातात घेऊन पाठीमागून मिठू मिठू करणारे आहेत. जीवदान मिळालं ते तात्पुरतं आहे. कोर्टाने अध्यक्षांना रिझनेबल टाइम दिला आहे. बेकायदेशीर सरकारने राजीनामा दिला पाहिजे. मी राजीनामा दिला नसता तर मुख्यमंत्री झालो असतो. पण मला त्यात स्वारस्य नव्हतं. कोर्टाने लक्तरे धिंडवडे काढल्यानंतर निवडणुकीला सामोरे जायला पाहिजे. जनतेच्या न्यायालयात जायला काय हरकत नाही. एकनाथ शिंदे यांनी त्वरीत राजीनामा दिला पाहिजे, असंही ते म्हणाले.

या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे यांच्यासोबत अनिल परब, अनिल देसाई आणि अरविंद सावंत उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. तर यावेळी अनिल परब यांनी कोर्टाच्या कायदेशीर बाबींचे वाचन करून दाखवले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -