घरCORONA UPDATEस्मशानभूमीत शववाहिन्यांच्या लांबच रांगा

स्मशानभूमीत शववाहिन्यांच्या लांबच रांगा

Subscribe

मुंबईतील प्रत्येक विद्युतदाहिनींच्या ठिकाणी शववाहिनींच्या रांगा लागलेल्या असून प्रत्येक शववाहिनींचा नंबर येण्यास सहा ते सात तासांची लागत असून मृतांच्या नातेवाईकांनाही यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे.

कोरोना कोविड बाधित रुग्णांना नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नाही, मृतांना नेण्यासाठी शववाहिनीची मिळत नाही, असे चित्र असताना आता मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठीही प्रतीक्षा करावी लागत आहे. मुंबईतील प्रत्येक विद्युतदाहिनींच्या ठिकाणी शववाहिनींच्या रांगा लागलेल्या असून प्रत्येक शववाहिनींचा नंबर येण्यास सहा ते सात तासांची लागत असून मृतांच्या नातेवाईकांनाही यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे.

कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्यांची विल्हेवाट प्लास्टिक पिशव्यांमध्ये गुंडाळून विद्युतदाहिनींवर केली जाते. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून नैसर्गिक मृत्यू पावलेल्या आणि कोविडमुळे मृत्यू पावणाऱ्यांच्या पार्थिवावर विद्युत अथवा पीएनजीवर आधारित गॅस दाहिनीवर अंत्यसंस्कार केले जातात. त्यामुळे विद्युत व गॅस दाहिनींवरील भार आता वाढत चालला आहे. सध्या सरसकट सर्वंच मृतदेह विद्युत दाहिनींवर जाळले जात असल्याने पारंपारिक पध्दतीने जळावू लाकडाद्वारे मृतदेहाची विल्हेवाट लावली जात नाही.

- Advertisement -

मागील काही दिवसांमध्ये कोविडमुळे मृत्यू पावणाऱ्यांचे प्रमाणे सरासरी ४० एवढे असून याशिवाय नैसर्गिक मृत्यू पावणाऱ्याचेही प्रमाण त्यापेक्षा अधिक आहे. परंतु सध्या सर्वच भार विद्युत व गॅस दाहिनींवर असल्याने मृतदेहांच्या विल्हेवाटीसाठी नातेवाईकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. काही विद्युत दाहिनींबाहेर कोविडच्या मृतदेह वाहून नेणाऱ्या शववाहिन्यांची रांगच लागलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे मृतदेहावरील अंत्यसंस्काराअभावी या शववाहिनी तासनतास स्मशानभूमीबाहेर रांगेत अडकून पडल्या जात असून परिणामी अनेक मृतांच्या नातेवाईकांनाही शववाहिनीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

शिवसेनेच्या दहिसरमधील नगरसेविका व विधी व महसूल समितीच्या अध्यक्षा शीतल म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या निदर्शनास ही बाब आणून देत स्मशानभूमींची माहिती देणारी दूरध्वनीची हेल्पलाईन सुरु करण्याची मागणी केली आहे. विद्युत व गॅस दाहिनींमध्ये केवळ कोरोनाबाधित व्यक्तींचेच अंत्यसंस्कार करण्यात यावेत अशी मागणी त्यांनी करत हेल्पलाईनची सुरु करण्याची सूचना केली. या हेल्पलाईनद्वारे कोणत्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास कमीत कमी वेळ लागेल याची माहिती नागरिकांना देण्यात यावी. जेणेकरून नागरिकांचा मनस्ताप व वेळही वाचेल, असे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -